येवल्यात ऐतिहासिक 'रंगांचे सामने' उत्साहात; १०० वर्षांची परंपरा युवा वर्गाकडून जोपासली येवला: नाशिक जिल्ह्यात होळीनंतर पाचव्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा. पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपत 'रंगांचे सामने' मोठ्या थाटात पार पडले. वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगांत न्हाऊन निघालं होतं. शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगांचे मोठे ड्रम भरून आणले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या खेळाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना, एकमेकांवर होणारा रंगांचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. टिळक मैदानानंतर हे सामने डी जे रोड परिसरात रंगले. हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सामन्यांची सुरुवात रंगांच्या आझाद चौक व डीजे रोड येथे ट्रॅक्टर समोर कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ वाढून सुरुवात करण्यात आले याप्रसंगी संजय कुक्कुर, अविनाश कुक्कर, प्रभाकर झळके सर शिवसेनेतर्फे यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना गटनेते शिंदे,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, रोहित जावळे, सागर शिंदे शहर प्रमुख विशाल परदेशी प्रशांत शिंदे बंटी कुक्कर अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

- येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा1
- राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.1
- मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप व एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान उपस्थित होते. महापालिकांना विकासकामांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुमारे २५ हजार कोटींची विकासकामे सुरू असून भविष्यात शहर गुंतवणुकीचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.1
- राजूरमध्ये डुप्लिकेट कृषी निविष्ठांमुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. नेमके या प्रकरणामागे कोण आहे? आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल पाठपुरावा जनहित 24/7 सातत्याने करत राहणार आहे. 👉 अशाच ताज्या आणि धाडसी बातम्यांसाठी पाहत राहा – जनहित 24/7, आपल्या हक्काचा आवाज. 📺1
- 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 95457899661
- येवला: नाशिक जिल्ह्यात होळीनंतर पाचव्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा. पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपत 'रंगांचे सामने' मोठ्या थाटात पार पडले. वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगांत न्हाऊन निघालं होतं. शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगांचे मोठे ड्रम भरून आणले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या खेळाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना, एकमेकांवर होणारा रंगांचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. टिळक मैदानानंतर हे सामने डी जे रोड परिसरात रंगले. हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सामन्यांची सुरुवात रंगांच्या आझाद चौक व डीजे रोड येथे ट्रॅक्टर समोर कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ वाढून सुरुवात करण्यात आले याप्रसंगी संजय कुक्कुर, अविनाश कुक्कर, प्रभाकर झळके सर शिवसेनेतर्फे यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना गटनेते शिंदे,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, रोहित जावळे, सागर शिंदे शहर प्रमुख विशाल परदेशी प्रशांत शिंदे बंटी कुक्कर अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1