logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या शाह यांना 'उपटसुंभा' आणि 'उपरा' संबोधत ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही एकच असून ती बाळासाहेब ठाकरे यांची आणि आपली आहे, याची जाणीव त्या उपऱ्याला नाही. भाजपला कोणीही अध्यक्ष चालतो, हे ते उपरे विसरले. 'खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात. नुसता खुंटा लावला आहे, खालीवर काही नाही,' अशा शब्दांत ठाकरे यांनी अमित शाह यांच्या कोल्हापूरमध्ये 'शिवसेना आता एकच आहे' या वक्तव्याचा समाचार घेतला. फुटीर खासदार संजय दीना पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत उद्धव ठाकरे यांनी हा पलटवार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'मिंदे' गटावरही निशाणा साधला. 'तुमची दाढी वाढते का, दाढी देखील भाड्याने घेतली आहे?' असा सवाल करत ते म्हणाले की, जर जागा नसती मिळाली तर खासदार झाले असते का? खासदार झाले नसते तर हमीभाव मिळाला असता का, भाव नसता मिळाला. 'खायला सुद्धा भाव असायला लागतो', असे म्हणत त्यांनी 'मिंद्यांना मंत्री आणि आमदार कोणी केले?' असा प्रश्न विचारला. 'भाड्याने दाढी, गाडी, खुर्ची मिळेल, पण जीवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत,' असेही ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपने 'पाठीत वार केला'. ही जागा भाजप पुढील निवडणुकीत सोडणार आहे का? जर सोडणार असतील तर त्यांनी आत्ताच जाहीर करावे की हा मतदारसंघ आम्ही एकनाथ शिंदे यांना देतो. ईशान्य मुंबई मतदारसंघावर बोलताना ते म्हणाले की, इथे शिवसैनिक नाहीत तर पेटलेल्या मशाली दिसत आहेत. 'गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या.' वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो ते मी करणार आहे आणि त्याची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे. शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिले होते, उमेदवाराकडे पाहून नाही आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली, तोडली गेली आहे. ज्या भाजपला 'गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं', तेव्हा त्याचं बोट धरून मोठं केलं, अन्यथा कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. 'स्वतःचं काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे,' असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केला नाही, तो भाजपने केला. ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हानही त्यांनी दिले.

3 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
3 hrs ago
a55f2f07-3377-4fe4-97c8-159dbd14c650

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या शाह यांना 'उपटसुंभा' आणि 'उपरा' संबोधत ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही एकच असून ती बाळासाहेब ठाकरे यांची आणि आपली आहे, याची जाणीव त्या उपऱ्याला नाही. भाजपला कोणीही अध्यक्ष चालतो, हे ते उपरे विसरले. 'खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात. नुसता खुंटा लावला आहे, खालीवर काही नाही,' अशा शब्दांत ठाकरे यांनी अमित शाह यांच्या कोल्हापूरमध्ये 'शिवसेना आता एकच आहे' या वक्तव्याचा समाचार घेतला. फुटीर खासदार संजय दीना पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत उद्धव ठाकरे यांनी हा पलटवार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'मिंदे' गटावरही निशाणा साधला. 'तुमची दाढी वाढते का, दाढी देखील भाड्याने घेतली आहे?' असा सवाल करत ते म्हणाले की, जर जागा नसती मिळाली तर खासदार झाले असते का? खासदार झाले नसते तर हमीभाव मिळाला असता का, भाव नसता मिळाला. 'खायला सुद्धा भाव असायला लागतो', असे म्हणत त्यांनी 'मिंद्यांना मंत्री आणि आमदार कोणी केले?' असा प्रश्न विचारला. 'भाड्याने दाढी, गाडी, खुर्ची मिळेल, पण जीवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत,' असेही ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपने 'पाठीत वार केला'. ही जागा भाजप पुढील निवडणुकीत सोडणार आहे का? जर सोडणार असतील तर त्यांनी आत्ताच जाहीर करावे की हा मतदारसंघ आम्ही एकनाथ शिंदे यांना देतो. ईशान्य मुंबई मतदारसंघावर बोलताना ते म्हणाले की, इथे शिवसैनिक नाहीत तर पेटलेल्या मशाली दिसत आहेत. 'गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या.' वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो ते मी करणार आहे आणि त्याची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे. शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिले होते, उमेदवाराकडे पाहून नाही आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली, तोडली गेली आहे. ज्या भाजपला 'गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं', तेव्हा त्याचं बोट धरून मोठं केलं, अन्यथा कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. 'स्वतःचं काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे,' असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केला नाही, तो भाजपने केला. ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हानही त्यांनी दिले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची राज्यात '२४ तासांत कधीही फोन उचलणारे खासदार' अशी ख्याती आहे. ते महाराष्ट्रातून कितीही फोन आले तरी ते नेहमी उचलत असत, अशी त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षबदलाच्या निर्णयानंतर ते आता खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलणार का, तसेच राज्यातील आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे फोन यापुढेही उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, असे म्हटले जात आहे.
    1
    धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची राज्यात '२४ तासांत कधीही फोन उचलणारे खासदार' अशी ख्याती आहे. ते महाराष्ट्रातून कितीही फोन आले तरी ते नेहमी उचलत असत, अशी त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पक्षबदलाच्या निर्णयानंतर ते आता खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलणार का, तसेच राज्यातील आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे फोन यापुढेही उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, असे म्हटले जात आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्व, संघटन कौशल्य आणि अथक परिश्रमांच्या बळावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवलेल्या ग्रामविकास आणि सोलापूरच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांचे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पालन केले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करताना जयकुमार गोरेंनी प्रशासनात शिस्त आणण्याबरोबरच विविध विकासकामांना गती दिली आहे. नगरपरिषद निवडणुकांपासून जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत भाजपला मिळालेल्या यशामागे त्यांचे नियोजन, कार्यकर्त्यांशी असलेला सुसंवाद आणि तळागाळातील जनसंपर्क महत्त्वाचा ठरला. अवघ्या काही दिवसांत घेतलेल्या सभा, बैठका आणि प्रचार दौऱ्यांमुळे पक्ष संघटनेला मोठी ऊर्जा मिळाली आणि अनेक ठिकाणी कमळ फुलले. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात धैर्यशील कदम (दादा) आणि सोलापूर मतदारसंघात राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी जयकुमार गोरेंनी रात्रंदिवस मेहनत घेतली. प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत त्यांनी मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत विजयाचा मजबूत पाया रचला. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असताना, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होऊन पुन्हा एकदा सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये कमळ फुलणार, असा विश्वास कार्यकर्ते आणि जनतेमध्ये व्यक्त होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे कमळ फुलले असल्याचा निर्वाळा दिला जात आहे.
    1
    राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्व, संघटन कौशल्य आणि अथक परिश्रमांच्या बळावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवलेल्या ग्रामविकास आणि सोलापूरच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांचे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पालन केले.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करताना जयकुमार गोरेंनी प्रशासनात शिस्त आणण्याबरोबरच विविध विकासकामांना गती दिली आहे. नगरपरिषद निवडणुकांपासून जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत भाजपला मिळालेल्या यशामागे त्यांचे नियोजन, कार्यकर्त्यांशी असलेला सुसंवाद आणि तळागाळातील जनसंपर्क महत्त्वाचा ठरला. अवघ्या काही दिवसांत घेतलेल्या सभा, बैठका आणि प्रचार दौऱ्यांमुळे पक्ष संघटनेला मोठी ऊर्जा मिळाली आणि अनेक ठिकाणी कमळ फुलले.

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात धैर्यशील कदम (दादा) आणि सोलापूर मतदारसंघात राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी जयकुमार गोरेंनी रात्रंदिवस मेहनत घेतली. प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत त्यांनी मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत विजयाचा मजबूत पाया रचला.

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असताना, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होऊन पुन्हा एकदा सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये कमळ फुलणार, असा विश्वास कार्यकर्ते आणि जनतेमध्ये व्यक्त होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे कमळ फुलले असल्याचा निर्वाळा दिला जात आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    19 min ago
  • वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    1
    वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    1
    आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    22 hrs ago
  • मालवणमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी पुढे नमूद केले की, योगामुळे शरीर सुदृढ होते, मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असे आवाहन त्यांनी केले. भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक जीवनपद्धती आहे, ज्यामुळे नियमित योगाभ्यासाने विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
    4
    मालवणमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी पुढे नमूद केले की, योगामुळे शरीर सुदृढ होते, मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असे आवाहन त्यांनी केले. भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक जीवनपद्धती आहे, ज्यामुळे नियमित योगाभ्यासाने विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    1
    शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ६.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मौजे वेणुपुरी, तालुका भोर येथील नीरा देवघर धरणात लोणी काळभोर येथील चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. या चार तरुणांपैकी देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्ष), जो लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी होता, तो धरणाच्या पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच भोईराज जलापती व्यवस्थापन आणि पोलीस स्टाफ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देवेश राज मिश्रा यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला आहे.
    2
    पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ६.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मौजे वेणुपुरी, तालुका भोर येथील नीरा देवघर धरणात लोणी काळभोर येथील चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. या चार तरुणांपैकी देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्ष), जो लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी होता, तो धरणाच्या पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच भोईराज जलापती व्यवस्थापन आणि पोलीस स्टाफ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देवेश राज मिश्रा यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज वाहक तारा व विजेचे खांब पडले आहेत, ज्यामुळे या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामे तात्काळ व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या परिस्थितीत महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत आमदार काळे यांनी त्यांना सज्जड दम दिला.
    1
    कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज वाहक तारा व विजेचे खांब पडले आहेत, ज्यामुळे या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामे तात्काळ व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या परिस्थितीत महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत आमदार काळे यांनी त्यांना सज्जड दम दिला.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.