logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

105 कवींचे भव्य ‘सतेज काव्य संमेलन’ 11 एप्रिलला; पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार भूपाल शेटे यांना कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सतेज काव्य मंच’च्या वतीने 105 कवींचे भव्य ‘सतेज काव्य संमेलन’ शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी डॉ. वसंत भागवत भूषवणार आहेत. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना पहिला ‘सतेज कार्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते व निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध भागांतून कवी सहभागी होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक व चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख पाच हजार रुपये, पंचवीस हजार रुपयांची पुस्तके आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भूपाल शेटे यांनी गेली 35 ते 40 वर्षे कुष्ठरोगी बांधवांची निस्वार्थ सेवा केली आहे. ते दरवर्षी स्वखर्चातून त्यांच्या मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करतात. वंचित आणि बहुजन घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा बाबा आमटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. मिनल राजहंस आणि डॉ. वसंत भागवत संपादित ‘नव्या विचारांच्या नव्या कविता’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही होणार आहे. राज्यभरातील नामांकित कवी या संमेलनात सहभाग घेऊन आपल्या कविता सादर करणार आहेत. काव्य संमेलन व पुरस्कार वितरण समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अनिता काळे, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, दिनकर आडसूळ आदी उपस्थित होते.

2 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
148038d7-77f8-46b6-a771-b54ad9168307

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "ते स्टेटस माझ्या लहान मुलीकडून चुकून ठेवले गेले होते, त्यामुळे कोणीही त्याचा राजकीय अपप्रचार करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.
    1
    सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "ते स्टेटस माझ्या लहान मुलीकडून चुकून ठेवले गेले होते, त्यामुळे कोणीही त्याचा राजकीय अपप्रचार करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    1
    सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत  18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    1
    स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥
सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥
अर्थ
स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    1
    BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    1
    पिंपरी चिंचवड : - 
अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा...
एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं....
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    1
    JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.