पाटोदा शिवारातील यात्रेत दगडफेक; होमगार्ड जखमी, 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. मंठा प्रतिनिधी - पाटोदा शिवारातील यात्रेत तमाशा मंडळासमोर वाद सुरू असताना पोलिसांना शिवीगाळ व दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप. या घटनेत होमगार्ड राहुल मनोहर पवार (वय 23) यांच्या डाव्या पायाच्या नळीवर दगड लागून जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान लोकनाट्य मंडळाजवळ शांतता राखण्याचे आवाहन करत असताना जमावाने दुर्लक्ष करून दगडफेक केली. याप्रकरणी विडोळी (ता. मंठा, जि. जालना) येथील रोहित संतोष अवचार, ज्ञानेश्वर देवीदास खरात, मनोज गोरे, मोहन गोरे, अमोल गोरे, काका रेंगे, आलम शेख, आदी महादेव अवचार, पवन दादाराव गोरे, आदित्य भगस, गोविंद रेंगे, महेश अवचार, दिपक गोरे, वैभव अवचार हे 14 आरोपींसह 8-10 अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदवला. पुढील तपास सहाय्यक पीआय निलेश इधाटे यांच्याकडे सोपवला असून, पीआय मनोज कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
पाटोदा शिवारातील यात्रेत दगडफेक; होमगार्ड जखमी, 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. मंठा प्रतिनिधी - पाटोदा शिवारातील यात्रेत तमाशा मंडळासमोर वाद सुरू असताना पोलिसांना शिवीगाळ व दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप. या घटनेत होमगार्ड राहुल मनोहर पवार (वय 23) यांच्या डाव्या पायाच्या नळीवर दगड लागून जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान लोकनाट्य मंडळाजवळ शांतता राखण्याचे आवाहन करत असताना जमावाने दुर्लक्ष करून दगडफेक केली. याप्रकरणी विडोळी (ता. मंठा, जि. जालना) येथील रोहित संतोष अवचार, ज्ञानेश्वर देवीदास खरात, मनोज गोरे, मोहन गोरे, अमोल गोरे, काका रेंगे, आलम शेख, आदी महादेव अवचार, पवन दादाराव गोरे, आदित्य भगस, गोविंद रेंगे, महेश अवचार, दिपक गोरे, वैभव अवचार हे 14 आरोपींसह 8-10 अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदवला. पुढील तपास सहाय्यक पीआय निलेश इधाटे यांच्याकडे सोपवला असून, पीआय मनोज कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
- महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.1
- Post by Raghunath Aghao1
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.1
- जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- Post by YUVA JALNA NEWS1