ज्येष्ठ शिक्षक लालू बनसोडे गुरुजी यांचे निधन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ; आज कोल्हे बोरगाव येथे अंत्यसंस्कार. नांदेड, दि. ११ मार्च : जुना काळातील अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे ज्येष्ठ शिक्षक लालू बनसोडे गुरुजी (जिगळेकर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बनसोडे गुरुजी हे चालते-बोलते विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेकांना शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयांवर प्रेरणा मिळाली. त्यांचे सासर कोल्हे बोरगाव (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे असून त्या ठिकाणी वारंवार बैठका व विचारमंथन होत असे. त्यांच्या सहवासातून अनेकांना ज्ञान व प्रेरणा मिळाली. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या राहत्या घरी कोल्हे बोरगाव येथे अंतिम यात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. प्रा. प्रशांत लालू बनसोडे यांचे ते वडील होत. बनसोडे गुरुजी यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून रयत सेवाभावी व सूर्यकार परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

- Post by गंगाधर जक्कुलवार1
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- Post by Nanded_71
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- Post by Nanded_71