Shuru
Apke Nagar Ki App…
ईद ए मिलादनिमीत्त बादोले बुद्रुक येथे रक्तदान शिबिर संपन्न जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्ताने बुधवारी बादोले बु. ता. अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन टिपू सुलतान ग्रुपचे महिबुब पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचे हे पहिले वर्ष असून सदर शिबीरात एकूण 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी शिव शंभू रक्तपेढी यांनी सहकार्य केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अकबर भाईजान, बशीर फुलारी, मोईन फुलारी, महिबूब शेख, वसीम कटकटे, मुज्जमिल शेख, महिबूब कटकटे, काशिनाथ पाटील, बशीर नदाफ, सैपन शेख तसेच टिपू सुलतान ग्रुपचे सदस्य यांनी प्रयत्न केले.
Akkalkot news
ईद ए मिलादनिमीत्त बादोले बुद्रुक येथे रक्तदान शिबिर संपन्न जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्ताने बुधवारी बादोले बु. ता. अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन टिपू सुलतान ग्रुपचे महिबुब पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचे हे पहिले वर्ष असून सदर शिबीरात एकूण 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी शिव शंभू रक्तपेढी यांनी सहकार्य केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अकबर भाईजान, बशीर फुलारी, मोईन फुलारी, महिबूब शेख, वसीम कटकटे, मुज्जमिल शेख, महिबूब कटकटे, काशिनाथ पाटील, बशीर नदाफ, सैपन शेख तसेच टिपू सुलतान ग्रुपचे सदस्य यांनी प्रयत्न केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.1
- लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.1
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट! हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन. लातूर (प्रतिनिधी) मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे. *हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!* दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे. *१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.* लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. *समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!* प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया! चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया! चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!1
- श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये प्रंसन्न वातावरणात पार पडला .1
- कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर लातूर शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल राबवलेल्या विशेष मोहिमेत अशा 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कार्यवाही करत ७,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काही वाहनचालक आपल्या बुलेटमध्ये बेकायदेशीरपणे फटाका सायलेन्सर बसवून शहरातून वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या कर्णकर्कश आणि अवाजवी आवाजामुळे लहान मुले, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली. नॉईज लेव्हल मीटरने होणार तपासणी: येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी 'नॉईज लेव्हल मीटर'चा वापर करून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या दुचाकीस्वारांनी नियमबाह्य सायलेन्सर बसवले आहेत, त्यांनी ते तात्काळ काढून कंपनीचे अधिकृत सायलेन्सर लावावेत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाचे आवाहन: "वाहनाचा कर्णकर्कश आवाज ही स्टाईल नसून, तो इतरांच्या त्रासाचे कारण ठरतो. सायलेन्सरचा गैरवापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."3