logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.

12 hrs ago
user_Digital media.
Digital media.
Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
12 hrs ago

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    1
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    1
    मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)

मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)
बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. 
*प्रमुख मागण्या:* 
1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात.
2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी.
3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत.
4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 
5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत.
6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा.
7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात .
8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा.
9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* ‌बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
    1
    *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे
*नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे*
‌बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी  माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई  सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या  सफाईची निविदा काढून 
कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक  शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता.
अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली  आहे.
    user_Rajeshkumar Jogdand
    Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    1
    केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार.
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित
या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले.
महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन
लातूर :  बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_अतिश कांबळे
    अतिश कांबळे
    Local News Reporter Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न
वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले.
आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा;
गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...”
या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    13 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.