logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

##डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे ‘डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे सोमेश मुळे जळगाव | प्रतिनिधी डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. सत्रादरम्यान स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या. ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले. यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

9 hrs ago
user_सोमेश किशोर मुळे
सोमेश किशोर मुळे
पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
9 hrs ago
409c5b12-23c7-4c75-a974-b3894bb66e07

##डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे ‘डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे सोमेश मुळे जळगाव | प्रतिनिधी डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. सत्रादरम्यान स्नेहल पाटील

19894d7a-798a-4196-b098-4e131a45aa13

आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या. ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत

997adc78-b02a-45a4-8d8c-9fc225d06771

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले. यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त
    1
    धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣
    1
    ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣
✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣
    user_R k News
    R k News
    Jalgaon, Maharashtra•
    9 hrs ago
  • आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन*
जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    1
    सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS #AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate
    1
    वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS

विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS
#AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    3 hrs ago
  • विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    1
    विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    4
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान
भोकरदन इसरारखान पठाण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे.
जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे.
गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे.
समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    12 min ago
  • मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    1
    मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.