आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1
- बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*1
- धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.1
- कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.1
- Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ... धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी. #DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral1
- ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर1
- जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात Ancr - जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.1
- चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी1
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1