Shuru
Apke Nagar Ki App…
ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!1
- जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.1
- इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS बोरगाव सारवणी शाळा कार्यक्रमात मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचे धडाकेबाज भाषण | AQS NEWS1
- कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.1
- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, ठाकरेंची आमदार अंबादास दानवे लाईव्ह1
- पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता. क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता. या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.1
- हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन,1
- ‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा प्राणाहुतीचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे भावनिक वक्तव्य केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे म्हणत त्यांनी आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा इशारा दिला1
- छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावर गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून, सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत.1