परभणीत ‘मिनी सरस’ विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ; महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ परभणी, (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियान, जिल्हा परिषद परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सव’ दिमाखात सुरू झाला. या महोत्सवाचे उद्घाटन वनामकृवि चे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, डॉ. राकेश अहिरे, डॉ. भगवान असेवार तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांनी स्टॉल्स लावले असून, खाद्य महोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे. यामध्ये मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, हुर्डा पार्टी, भरड धान्यांपासून तयार पदार्थ, पाणीपुरी-चाट तसेच अस्सल मराठवाडी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच सेंद्रिय हळद, विविध डाळी, मसाले, लोणचे, पापड, काजू, बेदाणा, केळी चिप्स यांसारखी घरगुती उत्पादने उपलब्ध आहेत. शोभेच्या वस्तू, कापडी पिशव्या, लाकडी कोळपाट, खपली गहू यांचेही स्टॉल्स लावण्यात आले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माहितीपर स्टॉल्सचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दरम्यान दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा महोत्सव 12 ते 17 मार्च 2026 दरम्यान शेतकरी भवन मैदान, काळीकमान (वनामकृवि), परभणी येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. परभणीकरांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या परिश्रमातून तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर आणि प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील यांनी केले. दरम्यान, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक धनंजय भिसे, विठ्ठल मुळे, गजानन सोनावणे तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील उमेद अभियानाची टीम परिश्रम घेत आहे.

- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- Post by Ramesh Mulgir1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।1
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले! काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे1
- छत्रपती संभाजीनगरात उच्च न्यायालयातील वकिलाची निर्घृण हत्या ! छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी (दि. १५ एप्रिल) रात्री उशिरा उच्च न्यायालयातील वकील अॅड. मिथुन पुंडलिक भास्कर (वय ४९) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूमुळे विधी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.1