logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नेमण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे राजकीय पक्षांना आवाहन परभणी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशातील 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत मतदार मॅपिंग प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. यामध्ये 2002 च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे 2025 च्या मतदार यादीशी मॅपिंग, तसेच 2002 च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांचे त्यांच्या आई-वडील अथवा आजी-आजोबा (Progeny Mapping) यांच्याशी नोंदी करून मॅपिंग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यासंबंधी सूचना देखील दिल्या. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी SIR संदर्भातील शंका विचारल्या, ज्यांचे निरसन करण्यात आले. जिल्ह्यातील 1,623 मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे बीएलए नेमणे आवश्यक असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी तात्काळ बीएलए नेमणुका करण्याचे आवाहन केले. तसेच बीएलए यांच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट केले. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह गजानन चिभडे (शिवसेना), ओंकार दुधाटे (भारतीय जनता पार्टी), रामराजे महाडीक (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), शेख हुसेन (आम आदमी पार्टी), ॲड. इम्तीयाज खान (AIMIM), जाफर खान (बहुजन समाज पार्टी), नरेश यरेळकर व लखन पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

3 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
3 hrs ago
2e7c351b-4ae5-4562-bd5b-a5bea3f4b9a1

प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नेमण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे राजकीय पक्षांना आवाहन परभणी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशातील 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत मतदार मॅपिंग प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. यामध्ये 2002 च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे 2025 च्या मतदार यादीशी मॅपिंग, तसेच 2002 च्या यादीत नाव नसलेल्या

67706ee2-76f7-4c9a-af6e-68287432dad1

मतदारांचे त्यांच्या आई-वडील अथवा आजी-आजोबा (Progeny Mapping) यांच्याशी नोंदी करून मॅपिंग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यासंबंधी सूचना देखील दिल्या. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी SIR संदर्भातील शंका विचारल्या, ज्यांचे निरसन करण्यात आले. जिल्ह्यातील 1,623 मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे बीएलए नेमणे आवश्यक असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी तात्काळ बीएलए नेमणुका करण्याचे आवाहन केले. तसेच बीएलए यांच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट केले. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह गजानन चिभडे (शिवसेना), ओंकार दुधाटे (भारतीय जनता पार्टी), रामराजे महाडीक (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), शेख हुसेन (आम आदमी पार्टी), ॲड. इम्तीयाज खान (AIMIM), जाफर खान (बहुजन समाज पार्टी), नरेश यरेळकर व लखन पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शासनाचा नदी जोड प्रकल्प मोठा आहे परंतु सध्या पडीक बंधारे दुरुस्त करण्याची वेळ आहे हिकमत दादा आमदार घनसांगी
    1
    शासनाचा नदी जोड प्रकल्प मोठा आहे परंतु सध्या  पडीक बंधारे दुरुस्त करण्याची वेळ आहे हिकमत दादा आमदार घनसांगी
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Parmeshor Khoje
    1
    Post by Parmeshor Khoje
    user_Parmeshor Khoje
    Parmeshor Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    1
    जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- ​वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. ​तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. ​पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण.
वडवणी प्रतिनिधी- 
​वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा  बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.
​तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा.
​पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    9 hrs ago
  • जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे
    1
    जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका  काय राहील हे विचारली  त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे  त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते  उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत  स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली
    1
    जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.