logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ही पदवी द्यावी अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे कष्टकरी व वंचिताचा आवाज : माजी मंत्री आ.संजय बनसोडे उदगीर (प्रतिनिधी) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्य नसून कष्टकरी, श्रमिक, दलित आणि वंचित समाजाच्या वेदना, संघर्ष व स्वाभिमानाला शब्दबद्ध करणारा बुलंद आवाज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले. उदगीर येथील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, गटनेते दिलीप मटके, तहसिलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी दिपक मोरे, बन्शिलाल कांबळे, प्रा. रामकिशन सोनकांबळे, नगरसेवक अनिल मुदाळे, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, बाळासाहेब मरलापल्ले, राजकुमार भालेराव, राजकुमार हुडगे, जवाहरलाल कांबळे, धिरज कसबे, अमर सुर्यवंशी, वर्षा कांबळे, शिवकुमार कांबळे, बाळासाहेब पाटोदे, अशोक पुदाले, गणेश गायकवाड, राजकुमार लिंबाळे, विरेंद्र अंबरखाने, ओम गांजुरे, कल्याण कपाळे, मुकरम जहागिरदार, व्यंकट बोईनवाड, इमरोज हाशमी, इब्राहिम नाना, जफर सय्यद, राजकुमार चव्हाण, नवनाथ गायकवाड, अरविंद गिलचे, संघशक्ती बलांडे, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, रविंद्र बेंद्रे, बालाजी रणदिवे, प्रेम जवळगेकर, देवीलाल कांबळे, महादेव शेल्हाळकर, राजु सुर्यवंशी, राम मोतीराम, नागेश गुंडीले, अंबादास कांबळे, गौतम किंवडे, आनंद बोडके, ऋषी लांडगे, दुर्गाप्रसाद गोटमुकले, अमोल सुर्यवंशी, राम कांबळे, सलिम शेख, आदी उपस्थित होते. आ.संजय बनसोडे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात प्रभावी आवाज उठवला. त्यांनी लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आपल्या साहित्याद्वारे जनमानसात रुजवली. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोककलेतून सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला स्वतंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देवुन करावा अशी मागणी मी मागील काळात सरकारकडे केली असुन त्यासाठी माझा पाठपुरावा चालु असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले. आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून उदगीर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने १५ कोटीचे भव्य स्मारक आणि अण्णाभाऊ साठे यांचा १५ फुटी पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या एक वर्षात सदर काम पुर्ण होईल असे सांगितले. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सिलाल कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन किरण सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश देवनाळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
4ee362dc-f2ce-4cc4-ac0e-26fceaeb9555

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ही पदवी द्यावी अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे कष्टकरी व वंचिताचा आवाज : माजी मंत्री आ.संजय बनसोडे उदगीर (प्रतिनिधी) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्य नसून कष्टकरी, श्रमिक, दलित आणि वंचित समाजाच्या वेदना, संघर्ष व स्वाभिमानाला शब्दबद्ध करणारा बुलंद आवाज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले. उदगीर येथील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, गटनेते दिलीप मटके, तहसिलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी दिपक मोरे, बन्शिलाल कांबळे, प्रा. रामकिशन सोनकांबळे, नगरसेवक अनिल मुदाळे, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, बाळासाहेब मरलापल्ले, राजकुमार भालेराव, राजकुमार हुडगे, जवाहरलाल कांबळे, धिरज कसबे, अमर सुर्यवंशी, वर्षा कांबळे, शिवकुमार कांबळे, बाळासाहेब पाटोदे, अशोक पुदाले, गणेश गायकवाड, राजकुमार लिंबाळे, विरेंद्र अंबरखाने, ओम गांजुरे, कल्याण कपाळे, मुकरम जहागिरदार, व्यंकट बोईनवाड, इमरोज हाशमी, इब्राहिम नाना, जफर सय्यद, राजकुमार चव्हाण, नवनाथ गायकवाड, अरविंद गिलचे, संघशक्ती बलांडे, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, रविंद्र बेंद्रे, बालाजी रणदिवे, प्रेम जवळगेकर, देवीलाल कांबळे, महादेव शेल्हाळकर, राजु सुर्यवंशी, राम मोतीराम, नागेश गुंडीले, अंबादास कांबळे, गौतम किंवडे, आनंद बोडके, ऋषी लांडगे, दुर्गाप्रसाद गोटमुकले, अमोल सुर्यवंशी, राम

2ef9245a-e2ec-4e05-aeb4-066348a02fde

कांबळे, सलिम शेख, आदी उपस्थित होते. आ.संजय बनसोडे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात प्रभावी आवाज उठवला. त्यांनी लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आपल्या साहित्याद्वारे जनमानसात रुजवली. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोककलेतून सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला स्वतंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देवुन करावा अशी मागणी मी मागील काळात सरकारकडे केली असुन त्यासाठी माझा पाठपुरावा चालु असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले. आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून उदगीर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने १५ कोटीचे भव्य स्मारक आणि अण्णाभाऊ साठे यांचा १५ फुटी पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या एक वर्षात सदर काम पुर्ण होईल असे सांगितले. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सिलाल कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन किरण सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश देवनाळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न



मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल


नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    1
    लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    2
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    1
    चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026.
लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. 
या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.