logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्ती व वाहतुकीचे नियम पाळण्याचे बंधन. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियम जनजागृती व हेल्मेट सक्ती तसेच प्रथमोपचार माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय वाढले असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी होत आहे, एकंदरीत अपघाताचा अभ्यास केल्यास 50 टक्के पेक्षा जास्त अपघातात मोटरसायकलस्वार मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात 20 एप्रिल 2026 पासून मोटार सायकल चालवणारा व पाठीमागे बसणाऱ्या इसमास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट मोटार सायकल चालू नये, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे , वेळोवेळी चालकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावे, वहाणाचे फिटनेस तपासावे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या. अपघात स्थळी नागरिकांनी जखमी लोकांना मदत करावी, तात्काळ 112 व 108 वर निशुल्क कॉल करून पोलीस व वैद्यकीय मदत बोलावून घ्यावी व हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. अपघातात मदत करणाऱ्या लोकांची ओळख देणे बंधनकारक नाही तसेच त्यांना कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागणार नाही . तसेच पीएम राहत योजनेअंतर्गत अपघातात जखमी इसमांना मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये दीड लाखापर्यंत मोफत उपचार असणार आहे अशा प्रकारचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा वाहतूक नियमाबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन चालू नये, पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना वाहन देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले. सदर प्रसंगी वैद्यकीय पथकाद्वारे प्रथमोपचार बाबत व सीपीआर बाबत प्रात्याक्षीक दाखवण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन , अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, मोहन भोसले पोनि स्थागुशा, संदीप मोदे पोनि हिंगोली श. , जमीर नाईक पोनि जिविशा, शरद मरे पोनि शहर वाहतूक शाखा , चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने परिवहन अधिकारी यांचे सह डॉक्टर पथक , सर्व ठाणेदार तसेच प्रतिष्ठित नागरिक, खाजगी प्रवासी वाहतूक करणारे चालक, शाळेतील विद्यार्थी, पोलीस पाटील, पत्रकार यांचे सह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले.

3 hrs ago
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
3 hrs ago
51132b4a-4acc-417a-b726-a6181e17a1ee

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्ती व वाहतुकीचे नियम पाळण्याचे बंधन. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियम जनजागृती व हेल्मेट सक्ती तसेच प्रथमोपचार माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय वाढले असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी होत आहे, एकंदरीत अपघाताचा

ca177874-0549-4576-84f0-79e8eade0468

अभ्यास केल्यास 50 टक्के पेक्षा जास्त अपघातात मोटरसायकलस्वार मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात 20 एप्रिल 2026 पासून मोटार सायकल चालवणारा व पाठीमागे बसणाऱ्या इसमास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट मोटार सायकल चालू नये, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे , वेळोवेळी चालकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावे, वहाणाचे फिटनेस तपासावे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या. अपघात स्थळी नागरिकांनी जखमी लोकांना मदत करावी, तात्काळ 112 व 108

f324a8c8-03a0-47f9-a1c5-b3d9786f5ab3

वर निशुल्क कॉल करून पोलीस व वैद्यकीय मदत बोलावून घ्यावी व हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. अपघातात मदत करणाऱ्या लोकांची ओळख देणे बंधनकारक नाही तसेच त्यांना कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागणार नाही . तसेच पीएम राहत योजनेअंतर्गत अपघातात जखमी इसमांना मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये दीड लाखापर्यंत मोफत उपचार असणार आहे अशा प्रकारचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा वाहतूक नियमाबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन चालू नये, पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना वाहन देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले. सदर प्रसंगी वैद्यकीय पथकाद्वारे प्रथमोपचार बाबत व सीपीआर बाबत प्रात्याक्षीक

03b504de-02a3-42bf-9ac7-0b6b7f1acf67

दाखवण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन , अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, मोहन भोसले पोनि स्थागुशा, संदीप मोदे पोनि हिंगोली श. , जमीर नाईक पोनि जिविशा, शरद मरे पोनि शहर वाहतूक शाखा , चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने परिवहन अधिकारी यांचे सह डॉक्टर पथक , सर्व ठाणेदार तसेच प्रतिष्ठित नागरिक, खाजगी प्रवासी वाहतूक करणारे चालक, शाळेतील विद्यार्थी, पोलीस पाटील, पत्रकार यांचे सह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले.

More news from Hingoli and nearby areas
  • Post by M B B
    1
    Post by M B B
    user_M B B
    M B B
    Kalamnuri, Hingoli•
    5 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    47 min ago
  • Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    2
    Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ”
क्षितिज पुरम…
जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by माधव गायकवाड
    4
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.