Shuru
Apke Nagar Ki App…
Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात! Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
Sayad Jamil
Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात! Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. अपुर्या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.2
- Post by M B B1
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती1
- पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1