logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कंधार तालुक्यात भीषण अपघात; अरुंद पुलावरून कार कोसळून पाच जखमी नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

2 hrs ago
user_MUKRAMABAD MDL
MUKRAMABAD MDL
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago

कंधार तालुक्यात भीषण अपघात; अरुंद पुलावरून कार कोसळून पाच जखमी नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Laxman Ugile
    1
    Post by Laxman Ugile
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    2
    Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ”
क्षितिज पुरम…
जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    1
    माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.
डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive
    1
    श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष 
फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष  आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले!
गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले 
“जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला 
लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला 
#जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    1
    प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद,                                   ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher बीड•
    20 hrs ago
  • चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे. दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले. सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
रविवार दिनांक 19 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे.
दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले.
सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.