देगलूर तालुक्यातील हणेगाव आणि परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, त्यांनी गावातील अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कुत्र्याने चावा घेतल्यानंतर दिली जाणारी रेबीज प्रतिबंधक लस हणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या एक वर्षापासून उपलब्ध नाही. लसींच्या या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून गंभीर दुर्घटना घडत आहेत. हणेगाव येथील सुनीता सुर्यकांत पटणे या महिलेला १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतात सोयाबीन पिकात खुरपणी करताना सर्पदंश झाला होता. प्राथमिक उपचारानंतर कर्नाटक राज्यातील बिदर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हणेगाव, मरखेल आणि शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज, स्नेक व्हेनम (सर्पदंश प्रतिबंधक लस), इम्युनोग्लोबुलिन किंवा सिरम, न्युमोनिया, पोलिओ आणि धनुर्वात यांसारख्या अत्यंत आवश्यक प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. स्थानिक पातळीवर वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे; परंतु शेजारील कर्नाटक राज्यातील औराद, बिदर, मदनूर तसेच तेलंगणा राज्यातील बासवाड आणि बोधन येथेही कधीकधी लस उपलब्ध नसते. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्राम विस्तार अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्वरित लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
देगलूर तालुक्यातील हणेगाव आणि परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, त्यांनी गावातील अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कुत्र्याने चावा घेतल्यानंतर दिली जाणारी रेबीज प्रतिबंधक लस हणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या एक वर्षापासून उपलब्ध नाही. लसींच्या या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून गंभीर दुर्घटना घडत आहेत. हणेगाव येथील सुनीता सुर्यकांत पटणे या महिलेला १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतात सोयाबीन पिकात खुरपणी करताना सर्पदंश झाला होता. प्राथमिक उपचारानंतर कर्नाटक राज्यातील बिदर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हणेगाव, मरखेल आणि शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज, स्नेक
व्हेनम (सर्पदंश प्रतिबंधक लस), इम्युनोग्लोबुलिन किंवा सिरम, न्युमोनिया, पोलिओ आणि धनुर्वात यांसारख्या अत्यंत आवश्यक प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. स्थानिक पातळीवर वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे; परंतु शेजारील कर्नाटक राज्यातील औराद, बिदर, मदनूर तसेच तेलंगणा राज्यातील बासवाड आणि बोधन येथेही कधीकधी लस उपलब्ध नसते. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्राम विस्तार अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्वरित लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील उदगीर रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली, स्वर्गवासी अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व जनहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी २० जुलै २०२६ रोजी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आठवडाभर राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व जनहितोपयोगी कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह लक्ष्मीकांत पदमवार सावकार, मधुकर नारलावार, नंदकिशोर शाखावार, देवेंद्र मोतेवार सावकार, व्यंकटराव कांबळे, प्रा. उत्तम कुमार कांबळे, अनिल बोन्लावार, शरीफ मामु, बालाजी मैलागीरे, मनोज तोटावार, दिगंबर कडलवार, सय्यद सर, मिलिंद बिरकंगन, दिगंबर कौरवार, अनिल तोताडे, अख्तर हाश्मी, खालिद पटेल, सादक भाई, ॐकार उल्लेवार, सय्यद मोहियोद्दिन, विकास मोरे, पाशा भाई, मोईन मिस्त्री, संजय चिन्नमवार, राज गायकवाड, द्याडे अप्पा, संतोष उनग्रतवार, योगेश मैलागीरे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- निट पेपर फुटीच्या संदर्भात सोनम वांगचुक यांनी केलेल्या आमरण उपोषणाच्या स्मरणार्थ नांदेडमध्ये एकदिवसीय सत्याग्रह करण्यात आला आहे.1
- नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक वनीकरण विभागातील पात्र कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे पात्र कामगार गेल्या एक ते दीड वर्षांपासून उपेक्षित असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे।1
- नांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांची संयुक्त आढावा बैठक परभणी येथील सुवर्णा लॉन्स येथे पार पडली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रिक्स ह्युमन राईट मिशन आणि भारतीय लघुउद्योग विभाग यांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात ही बैठक संपन्न झाली. यावेळी खंडापूरकर बाबा यांनी राज्यात उघड होत असलेल्या भ्रष्टाचारावर योग्य कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. परिवहन विभाग, आरटीओ अधिकारी आणि ट्रॅफिक पोलिसांकडून सर्वसामान्य वाहनधारकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड झालेली अवैध दंड वसुली थांबवण्यासाठी त्यांनी शासनाला इशारा दिला आहे. गेल्या ८ जुलै रोजी लातूर आरटीओ कार्यालयावर याविरोधात तीव्र मोर्चा काढण्यात आला होता. येत्या १० ऑगस्टपूर्वी ही अवैध दंड वसुली बंद झाली नाही आणि सर्वसामान्य वाहनधारकांना दिला जाणारा त्रास थांबला नाही, तर संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बैठकीत खंडापूरकर बाबा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरही मोठा हल्लाबोल केला. तलाठी, ग्रामसेवक, गिरधावर, डॉक्टर, परिचारिका आणि शिक्षक हे आपापल्या सज्जामध्ये (मुख्यालयी) राहत नसून, खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी शासनाची तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी उघड केले. याविरोधात चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावात मोठे आंदोलन झाले होते, ज्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष नवनाथ मांडे, त्यांच्या पत्नी मनीषा मांडे आणि कुटुंबियांनी पाणी चोरी करणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्याविरोधात पाच दिवसांचे आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात चाळीसगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या तीव्र मोर्च्यासमोर अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांना झुकावे लागले होते आणि कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेला हा गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामे पूर्णपणे बंद करून 'भष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि भ्रष्टाचारमुक्त भारत' घडवण्याचा संकल्प अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा असल्याचे खंडापूरकर बाबा यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. परभणी येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला मराठवाड्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.3
- लातूर शहराजवळील खंडापूर शिवारात आयोजित अखंड हरीनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी दिलेल्या दानाच्या पैशांवर डल्ला मारून फरार झालेल्या किशोर शिवणीकर जाधव उर्फ पिस्तुल्या महाराजाची पोलीस कोठडी संपली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आता त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, पिस्तुल्या महाराजाच्या बहुचर्चित दीड कोटी रुपयांच्या बंगल्यावर देखील आता कारवाई होणार असून तो बंगला जप्त करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ११ लाख रुपयांची रोख रक्कम देखील जप्त केली आहे. या प्रकरणात पिस्तुल्या महाराजाशी संबंधित आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून, त्या चारही आरोपींना शोधून अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता आणखी कोणते नवे खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।1
- मुंबईतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध 'सिने स्टिल टीव्ही अँड मोशन फोटोग्राफर्स असोसिएशन'तर्फे दरवर्षीप्रमाणे २०२६ या वर्षातही असोसिएशनच्या सदस्यांच्या पाल्यांना मोफत नोटबुकचे वाटप करण्यात आले आहे. समाजसेवक, निर्माते आणि पत्रकार तसेच संस्थेचे मानद आजीवन सदस्य के. रवि (दादा) यांच्या 'एक लिया मीडिया लिंक एंड इवेंटस मैनेजमेंट'च्या पुढाकाराने आणि सौजन्याने संस्थेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्था दरवर्षी आपल्या फोटोग्राफर सदस्यांच्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अतुल राजकुले आणि अध्यक्ष जनाब अप्पी वारसी यांनी संपूर्ण समितीच्या वतीने श्री. के. रवि (दादा) यांचे मनापासून आभार मानले आहेत. के. रवि (दादा) यांचे सामाजिक कार्यांमधील योगदान अनेक वर्षांपासून सुरू असून बॉलिवूड क्षेत्रासाठीही ते सातत्याने मदत करत असतात. त्यांच्या या 'मोफत नोटबुक वाटप' कार्याबद्दल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करत कौतुक केले आहे.2
- देगलूर तालुक्यातील हणेगाव आणि परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, त्यांनी गावातील अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कुत्र्याने चावा घेतल्यानंतर दिली जाणारी रेबीज प्रतिबंधक लस हणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या एक वर्षापासून उपलब्ध नाही. लसींच्या या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून गंभीर दुर्घटना घडत आहेत. हणेगाव येथील सुनीता सुर्यकांत पटणे या महिलेला १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतात सोयाबीन पिकात खुरपणी करताना सर्पदंश झाला होता. प्राथमिक उपचारानंतर कर्नाटक राज्यातील बिदर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हणेगाव, मरखेल आणि शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज, स्नेक व्हेनम (सर्पदंश प्रतिबंधक लस), इम्युनोग्लोबुलिन किंवा सिरम, न्युमोनिया, पोलिओ आणि धनुर्वात यांसारख्या अत्यंत आवश्यक प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. स्थानिक पातळीवर वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे; परंतु शेजारील कर्नाटक राज्यातील औराद, बिदर, मदनूर तसेच तेलंगणा राज्यातील बासवाड आणि बोधन येथेही कधीकधी लस उपलब्ध नसते. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्राम विस्तार अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्वरित लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.2
- लातूर शहरातील राजीव गांधी चौक ते गरुड चौक रिंग रोडवर सोमवार, २० जुलै २०२६ रोजी गोजमगुंडे लॉन्स समोर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. एका दुचाकी आणि स्कुटीमध्ये झालेल्या या जोरदार धडकेमुळे दोन्ही चालक खाली कोसळले. या अपघातात एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून दुसरा चालक किरकोळ जखमी झाला आहे. या दोघांनाही तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक जनतेला वारंवार हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन करत आहेत. असे असतानाही नागरिक बिना हेल्मेटचे गाडी चालवत असल्याने त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत आहे.1