नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या १० दिवसांत नवदाम्पत्याचा मृत्यू नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या १० दिवसांत नवदाम्पत्याचा मृत्यू कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात अवघ्या दहा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली (ता. पाटण) येथील राजू झोरे (वय २५) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (वय २३) हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. येरफळे गावाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे पुढील चाक तुटून दूर फेकले गेले, तर पिकअप गाडीच्या समोरील काच पूर्णपणे फुटली. अपघातात राजू आणि राणी यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांचा विवाह अवघ्या १० दिवसांपूर्वीच झाला होता. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन संसाराला सुरुवात केलेल्या या जोडप्यावर काळाने अचानक झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सडादाढोली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी ज्या घरातून लग्नाची वरात निघाली होती, त्याच घरात आज अंत्यविधीचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. प्राथमिक तपासात हा अपघात वेग आणि बेफिकीर ओव्हरटेकिंगमुळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

- शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी1