logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वेअरहाऊस पावत्यांच्या आधारे 177 शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले होते, मात्र 133 खातेदार थकबाकीदार झाले. लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

9 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
9 hrs ago

वेअरहाऊस पावत्यांच्या आधारे 177 शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले होते, मात्र 133 खातेदार थकबाकीदार झाले. लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
    1
    ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६:
करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार.
ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६
शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज
महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा.
करवंड महोत्सव २०२६
करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 day ago
  • * बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गेल्या ३७० वर्षांपासून सुरू असलेली एक अनोखी परंपरा पार पडली. 'भेंडवळची घटमांडणी'—ज्याला विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरी एक विश्वासार्ह दिशादर्शक मानतात. यंदाच्या २०२६ च्या घटमांडणीतून समोर आलेले निष्कर्ष शेती, अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.यंदा पावसाच्या बाबतीत दिलासादायक बातमी अशी की, पाऊस चांगला होईल. विशेषतः जून महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. मात्र, हाच पाऊस अतिवृष्टीचे संकट घेऊन येणार आहे, ज्यामुळे नद्यांना महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा वेग मंदावेल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन समाधानकारक राहील. मात्र, ज्वारी, तूर आणि कडधान्यांची स्थिती मध्यम राहील. सर्वात चिंतेची बाब म्हणजे यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण अधिक असेल, त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.भेंडवळच्या भाकितानुसार, २०२६ मध्ये देशात सत्ता स्थिर राहील, म्हणजेच 'राजा कायम' असेल. मात्र, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रमुखांवर प्रचंड मानसिक तणाव असेल, असे संकेत आहेत. देशाची आर्थिक स्थिती यंदा फारशी सुखावह नाही; तिजोरीवर ताण वाढणार असून आर्थिक मंदीचे सावट जाणवू शकते.सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचा काळ आव्हानात्मक असल्याचे दिसते. देशाच्या सीमांवर तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते आणि संरक्षण यंत्रणेवरही ताण पडू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, पृथ्वीवर नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेत वाढ होण्याची भीतीही घटमांडणीतून व्यक्त करण्यात आली आहे.चंद्रभान महाराज वाघ यांच्या वंशजांनी, म्हणजेच पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी ही घटमांडणी केली आहे. हे भाकीत केवळ एक परंपरा नसून हजारो शेतकऱ्यांच्या नियोजनाचा आधार आहे. नैसर्गिक संकटांचा इशारा असला तरी, योग्य नियोजनाने या संकटांचा सामना करणे शक्य आहे, हाच या घटमांडणीचा मूळ संदेश आहे. संकलन: भेंडवळ घटमांडणी, अक्षय्य तृतीया २०२६.
    1
    *
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गेल्या ३७० वर्षांपासून सुरू असलेली एक अनोखी परंपरा पार पडली. 'भेंडवळची घटमांडणी'—ज्याला विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरी एक विश्वासार्ह दिशादर्शक मानतात. यंदाच्या २०२६ च्या घटमांडणीतून समोर आलेले निष्कर्ष शेती, अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.यंदा पावसाच्या बाबतीत दिलासादायक बातमी अशी की, पाऊस चांगला होईल. विशेषतः जून महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. मात्र, हाच पाऊस अतिवृष्टीचे संकट घेऊन येणार आहे, ज्यामुळे नद्यांना महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा वेग मंदावेल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन समाधानकारक राहील. मात्र, ज्वारी, तूर आणि कडधान्यांची स्थिती मध्यम राहील. सर्वात चिंतेची बाब म्हणजे यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण अधिक असेल, त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.भेंडवळच्या भाकितानुसार, २०२६ मध्ये देशात सत्ता स्थिर राहील, म्हणजेच 'राजा कायम' असेल. मात्र, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रमुखांवर प्रचंड मानसिक तणाव असेल, असे संकेत आहेत. देशाची आर्थिक स्थिती यंदा फारशी सुखावह नाही; तिजोरीवर ताण वाढणार असून आर्थिक मंदीचे सावट जाणवू शकते.सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचा काळ आव्हानात्मक असल्याचे दिसते. देशाच्या सीमांवर तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते आणि संरक्षण यंत्रणेवरही ताण पडू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, पृथ्वीवर नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेत वाढ होण्याची भीतीही घटमांडणीतून व्यक्त करण्यात आली आहे.चंद्रभान महाराज वाघ यांच्या वंशजांनी, म्हणजेच पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी ही घटमांडणी केली आहे. हे भाकीत केवळ एक परंपरा नसून हजारो शेतकऱ्यांच्या नियोजनाचा आधार आहे. नैसर्गिक संकटांचा इशारा असला तरी, योग्य नियोजनाने या संकटांचा सामना करणे शक्य आहे, हाच या घटमांडणीचा मूळ संदेश आहे.
संकलन: भेंडवळ घटमांडणी, अक्षय्य तृतीया २०२६.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    25 min ago
  • Post by M B B
    1
    Post by M B B
    user_M B B
    M B B
    Kalamnuri, Hingoli•
    3 hrs ago
  • मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
    1
    शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! 
तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.
    1
    महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते.
यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज
यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो.
मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.
शेती पिकांबाबत मोठे संकेत
यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः:
कापूस
सोयाबीन
तूर
मूग
उडीद
या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते.
मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
बाजारभाव कसे राहू शकतात?
घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत.
विशेषतः:
कापूस
तीळ
या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते.
तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
जनजीवनावर परिणाम
जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात:
रस्ते वाहतूक विस्कळीत होणे
वीजपुरवठा खंडित होणे
पूरस्थिती निर्माण होणे
शेतातील नुकसान होणे
अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला
पेरणी घाईघाईत करू नका.
स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या.
पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा.
बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा.
पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा.
हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा.
महत्वाची सूचना
मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.
निष्कर्ष
एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.