Shuru
Apke Nagar Ki App…
"सरकारने भरभरून मदत केली, मग उद्घाटनाला विरोध कशासाठी?"; खासदार धनंजय महाडिकांचा सवाल कोल्हापूर : रविराज कांबळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीनंतर राज्य सरकारने तातडीने मदत करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक सहकार्य केले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. नाट्यगृहाच्या खाजगी व्यवस्थापनाला विरोध करत रंगकर्मींनी उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसनेही आगप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
Raviraj kamble
"सरकारने भरभरून मदत केली, मग उद्घाटनाला विरोध कशासाठी?"; खासदार धनंजय महाडिकांचा सवाल कोल्हापूर : रविराज कांबळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीनंतर राज्य सरकारने तातडीने मदत करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक सहकार्य केले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. नाट्यगृहाच्या खाजगी व्यवस्थापनाला विरोध करत रंगकर्मींनी उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसनेही आगप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.1
- फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती. फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे1
- कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.1
- रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत1
- प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.1