एसबीआय रिसोड शाखेतर्फे आदिवासी आश्रमशाळेत सॅनिटरी पॅड्सचे वाटप; विद्यार्थिनींना दिले बँकिंग सुरक्षिततेचे धडे एसबीआय रिसोड शाखेतर्फे आदिवासी आश्रमशाळेत सॅनिटरी पॅड्सचे वाटप; विद्यार्थिनींना दिले बँकिंग सुरक्षिततेचे धडे रिसोड , भारतीय स्टेट बँक (SBI) शाखा रिसोडच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कंकरवाडी येथील पार्वतीबाई नागरे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींचे आरोग्य आणि आर्थिक साक्षरता या दोन्ही विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. बँकिंग सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले: यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक सत्यनारायण प्रसाद यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. "बँकेत खाते असणे ही काळाची गरज आहे," असे सांगत त्यांनी भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी आणि सुरक्षित बँक कशी आहे, याचे महत्त्व पटवून दिले. "आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी बँकेत खाते असणे आवश्यक असून, एसबीआयमध्ये तुमचे भविष्य सुरक्षित आहे," असे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला अनंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुंडलिकराव नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे प्राचार्य राधाकिसन नामदेव जुंजारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. एम. ए. मुंडढे, श्री. अनिल थोरात, श्री. दत्ता मोरे, श्री. सुधाकर कोल्हे, श्री. भाऊसाहेब जाधव, श्री. प्रदीप सदार, श्री. आत्माराम निळे, श्री. ओमकार हटवार, श्री. शेषराव घनदारे या शिक्षकांसह शिक्षिका कुमारी के.डी. सावरकर, कुमारी व्हि.के. ठोसर पवन खडसे, युवराज धोंडगे,व इतर सर्व कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम1