logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुरुंदवाड मध्ये लोकायत चषक बुद्धिबळ स्पर्धा प्रारंभ...आदित्य, अर्णव, अभय, दिशा, अथर्व, वरद,अवनीश व अधिराज आघाडीवर कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे कुरुंदवाड चेस अकॅडमीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या लोकायत चषक खुल्या व वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.. या स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माजी व्हाईस चेअरमन श्रीमती विनया घोरपडे व सौ.स्मिता आलासे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले...यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव व या स्पर्धेचे मुख्य पंच मनीष मारुलकर , लोकयत कोल्हापूरचे आर्.एस्. आलासे, कुरुंदवाड चेस अकॅडमीचे विनायक बिडकर, सच्चिदानंद आवटी, अविनाश बिडकर, रसूल पट्टेकरी, प्रशांत धनवडे व मनोज कुलकर्णी उपस्थित होते. मुंबई,ठाणे,पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, बेळगाव, रायबाग व स्थानिक कोल्हापूर इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, वारणानगर येथील नामवंत 192 बुद्धिबळपटू या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत...यापैकी 55 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत... खुल्या गट सतरा वर्षाखालील गट व अकरा वर्षाखालील गट अशा तीन स्वतंत्र गटात आयोजित केलेल्या या बुद्धिबळ स्पर्धा स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत..आज झालेल्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर खुल्या गटात द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर चार गुणासह आघाडीवर आहे. अग्रमानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले, तृतीय मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व बिगरमानांकित बत्तीसशिराळ चे प्रदीप कुमार नलवडे हे चौघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.सतरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित सांगलीचा आदित्य चव्हाण, तृतीय मानांकित ठाण्याचा आदित्य कदम, चौथा मानांकित जांभळी चा अभय भोसले व चौथी मानांकित जयसिंगपूरचे दिशा पाटील हे चौघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.अकरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित मिरजेचा वरद पाटील व सातवा मानांकित वारणानगरचा अधिराज डोईजड हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर तृतीय मानांकित सांगलीचा पृथ्वीराज पाटील साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.

on 22 March
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
on 22 March
b7b4bb60-7140-40f5-8911-e5f26f71d45c

कुरुंदवाड मध्ये लोकायत चषक बुद्धिबळ स्पर्धा प्रारंभ...आदित्य, अर्णव, अभय, दिशा, अथर्व, वरद,अवनीश व अधिराज आघाडीवर कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे कुरुंदवाड चेस अकॅडमीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या लोकायत चषक खुल्या व वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.. या स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माजी व्हाईस चेअरमन श्रीमती विनया घोरपडे व सौ.स्मिता आलासे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले...यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव व या स्पर्धेचे मुख्य पंच मनीष मारुलकर , लोकयत कोल्हापूरचे आर्.एस्. आलासे, कुरुंदवाड चेस अकॅडमीचे विनायक बिडकर, सच्चिदानंद आवटी, अविनाश बिडकर, रसूल पट्टेकरी, प्रशांत धनवडे व मनोज कुलकर्णी उपस्थित होते. मुंबई,ठाणे,पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, बेळगाव, रायबाग व स्थानिक कोल्हापूर इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, वारणानगर येथील नामवंत 192 बुद्धिबळपटू या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत...यापैकी 55 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत... खुल्या गट सतरा वर्षाखालील गट व अकरा वर्षाखालील गट अशा तीन स्वतंत्र गटात आयोजित केलेल्या या बुद्धिबळ स्पर्धा स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत..आज झालेल्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर खुल्या गटात द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर चार गुणासह आघाडीवर आहे. अग्रमानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले, तृतीय मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व बिगरमानांकित बत्तीसशिराळ चे प्रदीप कुमार नलवडे हे चौघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.सतरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित सांगलीचा आदित्य चव्हाण, तृतीय मानांकित ठाण्याचा आदित्य कदम, चौथा मानांकित जांभळी चा अभय भोसले व चौथी मानांकित जयसिंगपूरचे दिशा पाटील हे चौघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.अकरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित मिरजेचा वरद पाटील व सातवा मानांकित वारणानगरचा अधिराज डोईजड हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर तृतीय मानांकित सांगलीचा पृथ्वीराज पाटील साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    1
    JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    1
    पिंपरी चिंचवड : - 
अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा...
एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं....
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    1
    आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.”
तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे  याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे....
: संभाजी कदम, पोलीस उपायुक्त
#हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज
#Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    1
    गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.