नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द (दत्ताचे शिंगवे) येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाधाप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला आहे. ५ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता ह.भ.प. अशोक महाराज सत्रे (वैजापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली. हा सोहळा निष्काम कर्मयोगी संत तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादनाने आणि ह.भ.प. प.पू. श्री संत तुकाराम महाराज जेऊरकर तसेच ह.भ.प. नारायणबाबा पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. मानव कल्याण, समता, विश्वबंधुभाव, तसेच गाव स्वावलंबी व तंटामुक्त व्हावे या उदात्त हेतूने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि भाविकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सप्ताहभरात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेमध्ये ह.भ.प. ईश्वरीताई व्हडगर (नांदूर), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज (वाडी भोकर), ह.भ.प. ऋषीकेश महाराज (कुयटे), ह.भ.प. उद्धव महाराज पवार (सावरगाव), ह.भ.प. अशोक महाराज बिडगर (दहेगाव), ह.भ.प. मोनिकाताई येवले (धामोडे) आणि ह.भ.प. गणेश महाराज कुटे (नाशिक) यांनी उपस्थित भाविकांना प्रबोधन केले. सप्ताहाच्या अंतिम दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यासाठी मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक, दरेगाव, मतोबाचे शिंगवे, डोणगाव, दहेगाव, कोकणखेडे, कानडगाव आणि कुंदलगाव परिसरातील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द (दत्ताचे शिंगवे) येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाधाप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला आहे. ५ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता ह.भ.प. अशोक महाराज सत्रे (वैजापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली. हा सोहळा निष्काम कर्मयोगी संत तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादनाने आणि ह.भ.प. प.पू. श्री संत तुकाराम महाराज जेऊरकर तसेच ह.भ.प. नारायणबाबा पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. मानव कल्याण, समता, विश्वबंधुभाव, तसेच गाव स्वावलंबी व तंटामुक्त व्हावे या उदात्त हेतूने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि भाविकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सप्ताहभरात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेमध्ये ह.भ.प. ईश्वरीताई व्हडगर (नांदूर), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज (वाडी भोकर), ह.भ.प. ऋषीकेश महाराज (कुयटे), ह.भ.प. उद्धव महाराज पवार (सावरगाव), ह.भ.प. अशोक महाराज बिडगर (दहेगाव), ह.भ.प. मोनिकाताई येवले (धामोडे) आणि ह.भ.प. गणेश महाराज कुटे (नाशिक) यांनी उपस्थित भाविकांना प्रबोधन केले. सप्ताहाच्या अंतिम दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यासाठी मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक, दरेगाव, मतोबाचे शिंगवे, डोणगाव, दहेगाव, कोकणखेडे, कानडगाव आणि कुंदलगाव परिसरातील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
- नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द (दत्ताचे शिंगवे) येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाधाप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला आहे. ५ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता ह.भ.प. अशोक महाराज सत्रे (वैजापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली. हा सोहळा निष्काम कर्मयोगी संत तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादनाने आणि ह.भ.प. प.पू. श्री संत तुकाराम महाराज जेऊरकर तसेच ह.भ.प. नारायणबाबा पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. मानव कल्याण, समता, विश्वबंधुभाव, तसेच गाव स्वावलंबी व तंटामुक्त व्हावे या उदात्त हेतूने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि भाविकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सप्ताहभरात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेमध्ये ह.भ.प. ईश्वरीताई व्हडगर (नांदूर), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज (वाडी भोकर), ह.भ.प. ऋषीकेश महाराज (कुयटे), ह.भ.प. उद्धव महाराज पवार (सावरगाव), ह.भ.प. अशोक महाराज बिडगर (दहेगाव), ह.भ.प. मोनिकाताई येवले (धामोडे) आणि ह.भ.प. गणेश महाराज कुटे (नाशिक) यांनी उपस्थित भाविकांना प्रबोधन केले. सप्ताहाच्या अंतिम दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यासाठी मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक, दरेगाव, मतोबाचे शिंगवे, डोणगाव, दहेगाव, कोकणखेडे, कानडगाव आणि कुंदलगाव परिसरातील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.1
- दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.1
- उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- धुळे जिल्ह्यातील मौजे दभाषी येथे माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या माध्यमातून भीमक्रांती नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सभागृहालगतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे कामात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी याच परिसरात विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडलेली असल्याने, येथे तातडीने भूमिगत केबल टाकणे अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभामंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि ही विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी या पोलचे त्वरित स्थलांतर होणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यासाठी माननीय मंत्रीमहोदयांनी ₹१० लाखांचा निधी मंजूर केला असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज पोलमुळे हे कामही रखडले आहे. कोणावरही टीका न करता केवळ गावाच्या विकासाला गती मिळावी, अडथळे दूर व्हावेत आणि जनहिताची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संपूर्ण दभाषी ग्रामस्थांची अपेक्षा असून "विकास थांबू नये... सुरक्षितता अबाधित राहावी..." हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.1
- नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.3