ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन (अहिल्यानगर जिल्हा) देवगडचे गुरूवर्य भास्कर गीरी महाराज,गुरूवर्य बालयोगी महाराज,आणि ह.भ.प. सुधिर महाराज भोसले यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १० ते १७ मे २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.या सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन,सकाळी ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी गाथा भजन, तिसऱ्या प्रहरी प्रवचन, सायंकाळी हरीपाठ,रात्री हरी किर्तन,मध्यरात्री हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.सर्व ह.भ.प. भालेराव काका दारकुंडे,गौरव महाराज सोनवणे,रामहरी महाराज गावंडे, बाबासाहेब महाराज मतकर, सर्जेराव महाराज जाधव,एकनाथ महाराज सायकड, बालयोगी महाराज यांची प्रवचने होणार आहेत तर सर्व ह.भ.प.महेश महाराज खाटेकर, गणेश महाराज चौधरी,सुधिर महाराज भोसले, सचिन महाराज डौले,महेश महाराज परदेशी, राम महाराज झिंजुर्के,उमेश महाराज दशरथे, ज्ञानेश्वर महाराज करंदीकर,यांची किर्तने होणार आहेत.रविवार दिनांक १७ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प.अनिल महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन होउन महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.ह.भ.प. शिवाजी महाराज काळे हे या सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व करणार आहेत तर ह.भ.प. कारभारी महाराज वीर, आणि रमेश महाराज रजपूत हे काकडा भजन आणि हरीपाठाचे नेतृत्व करणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताह काळात नजन,वीर, रोडगे,आर्ले, अमृत,वाघ, शेळके,नाबदे, बेळगे,गीर्हे, पारनाईक,काळे, लंगोटे या सर्व परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रती शिंगणापूर म्हणून या ताजनापूर येथिल शनिदेवाची महती सर्वदूर पसरलेली आहे.तरी पंच क्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ताजनापूर येथिल ग्रामस्थ आणि अखंड हरीणाम सप्ताह कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

- वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी... वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी कमलापूर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाळूज पोलीस स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.1
- जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.1
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1