logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे प्रतिपादन कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर सौ. रुपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते पार पडले. महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. ह्या स्वच्छता गृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशन आहे. स्वच्छता गृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तु विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. २५ वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहं बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. शहरातील खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं ही महिला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा रविवार १० मे रोजी महापौर सौ. रुपारणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री धनंजय महाडिक, आमदार श्री. अशोकराव माने, उप महापौर श्री अक्षय जरग, सभापती श्री विशाल शिराळे, गटनेते श्री आदिल फरास, श्री मुरलीधर जाधव, श्री शारंगधर देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. ह्या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना वूलू ह्या स्वच्छता गृहांच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा ह्या विषयी माहिती दिली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असताना वूलू स्वच्छता गृहाची संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणतूनच जन्माला आली असे प्रतिपादन केले. उत्तरार्धा मध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपूर्ण कोल्हापूर महानगर पालिका यांचे आभार मानले व वूलू चे कोल्हापूर मॉडेल हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रेरणा ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. सोबतच मा. खासदार श्री धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर महानगरपालिके मध्ये महायुती सरकार आल्यापासून जनतेला दिलेले अभिवचन अश्याच पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास दिला. कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी ही मनोगत व्यक्त केले. दरम्यान भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

2 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
dab0dd0a-d79a-4c85-af86-45e7a29589d1

वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे प्रतिपादन कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर सौ. रुपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते पार पडले. महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. ह्या स्वच्छता गृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशन आहे. स्वच्छता गृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तु विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. २५ वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहं बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. शहरातील खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं ही महिला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा रविवार १० मे रोजी महापौर सौ. रुपारणी

fd230e39-41d2-413b-840c-7682f0d4c971

निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री धनंजय महाडिक, आमदार श्री. अशोकराव माने, उप महापौर श्री अक्षय जरग, सभापती श्री विशाल शिराळे, गटनेते श्री आदिल फरास, श्री मुरलीधर जाधव, श्री शारंगधर देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. ह्या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना वूलू ह्या स्वच्छता गृहांच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा ह्या विषयी माहिती दिली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असताना वूलू स्वच्छता गृहाची संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणतूनच जन्माला आली असे प्रतिपादन केले. उत्तरार्धा मध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपूर्ण कोल्हापूर महानगर पालिका यांचे आभार मानले व वूलू चे कोल्हापूर मॉडेल हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रेरणा ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. सोबतच मा. खासदार श्री धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर महानगरपालिके मध्ये महायुती सरकार आल्यापासून जनतेला दिलेले अभिवचन अश्याच पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास दिला. कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी ही मनोगत व्यक्त केले. दरम्यान भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पिकअप आणि बसच्या भीषण अपघातात २८ वर्षीय चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कडलास येथील पांडुरंग लक्ष्मण गायकवाड यांचा एकतपूर पाटीजवळ अपघातस्थळीच अंत झाला.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पिकअप आणि बसच्या भीषण अपघातात २८ वर्षीय चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कडलास येथील पांडुरंग लक्ष्मण गायकवाड यांचा एकतपूर पाटीजवळ अपघातस्थळीच अंत झाला.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    1
    सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.
    1
    नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी 
विक्रम शिंदे /भोर दि.१०
नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    29 min ago
  • सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू... मावळ पुणे :- मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.... : लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC #तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या #Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews
    1
    तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू...
मावळ पुणे :-
मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत....
: लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC
#तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या
#Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    29 min ago
  • पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.
    1
    नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोलापूर शहरात मार्केट यार्ड परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
    1
    सोलापूर शहरात मार्केट यार्ड परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.