logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत ४.२६ कोटींची वसुली; १३० प्रकरणांचा निपटारा पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत ४.२६ कोटींची वसुली; १३० प्रकरणांचा निपटारा पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्री. एस. व्ही. निमसे, तालुका विधी सेवा समिती पाचोरा अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पाचोरा तहसीलदार विजय बनसोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रीय लोकअदालतीत मुख्य न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे आणि सहन्यायाधीश श्री. जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल ३ कोटी ७० लाख ३६ हजार ६७६ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच २४ वादपूर्व प्रकरणांचाही यशस्वी निपटारा करण्यात आला असून त्यातून ५५ लाख ८४ हजार ८८५ रुपयांची वसुली झाली. अशा प्रकारे एकूण १३० प्रकरणांचा निपटारा करत ४ कोटी २६ लाख २१ हजार ५६१ रुपयांची एकत्रित वसुली करण्यात आली. या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एस. व्ही. निमसे, लोकन्यायालयाच्या पंच ॲड. भाग्यश्री महालपुरे, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण बी. पाटील, उपाध्यक्ष ॲड.श्रीमती कविता मासरे(रायसाकडा), यांच्यासह सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, बँक अधिकारी व कर्मचारी, बीएसएनएल, एमएसईबीचे कर्मचारी, पाचोरा पोलीस स्टेशन व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नागरिकांनी भविष्यातही जास्तीत जास्त प्रमाणात लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

2 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी... वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी कमलापूर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाळूज पोलीस स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    वाळूज   पोलीस   स्टेशनजवळ भीषण   अपघात;  महिला जखमी...
वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी
कमलापूर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाळूज पोलीस स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    user_Nanuram pawara
    Nanuram pawara
    जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पंचायत समिती चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष,
    4
    पंचायत समिती 
चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष,
    user_M S Patil
    M S Patil
    अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    4 min ago
  • जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    1
    जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    1
    जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    23 hrs ago
  • १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    1
    १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया

छत्रपती संभाजीनगर पैठण:
लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.
कांदा उत्पादनासाठी
शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.