logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारताच्या विश्वचषक विजयाचा कुसुम सभागृहात जल्लोष; २०० क्रिकेटपटूंचा सत्कार. नांदेड : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत विजेतेपद पटकावल्याचा आनंद नांदेडकरांनी जल्लोषात साजरा केला. अमरनाथ राजुरकर आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहात मोठ्या पडद्यावर लावण्यात आलेला सामना पाहण्यासाठी शेकडो क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. यावेळी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा नांदेड महानगरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत अनुभवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण साले होते.यावेळी कुबेरनगरीचे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकटेश जिंदम, नगरसेवक आशिष नेरलकर व राजू यन्नम, बागड्या यादव, शिवप्रसाद राठी, धीरज स्वामी, तौसिफ अहमद, धनंजय नलबलवार, निलेश कुंटूरकर, चंचलसिंघ जट, राजन जोजारे, कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे, तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, रुपेश व्यास, महेंद्र तरटे, राजेश देशमुख ,हरजिंदरसिंघ संधू,संतोष मानधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रकाश उंटवाले, अरुण काबरा, सुरेश निल्लावार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सविता काबरा, स्नेहलता जायस्वाल, शिला जांभळे व रागिणी जोशी, सुषमा हुरणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन शीतल खांडील व लक्ष्मण खाडे यांनी केले. या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या नांदेडच्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, राजीव किवळेकर, सुधाकर पाढरे, शिवाजी डहाळे, रतन साडेगावकर, मंगेश कामतीकर, श्याम आडे, बालाजी गिरगावकर, रणजितसिंघ चिरागिया, परविंदरसिंघ रामगडीया,मोहनसिंघ रोडगी,राजू जाधव,रवी पाटील, शंकर नांदेडकर, शैलेश देशमुख, नरेंद्र पटवारी, राजा गायकवाड, प्रसन्न घोगरे, राम शेळके, सचिन चौहान, संतोष औंढेकर, वसंत साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. अश्या प्रकारचा गौरव पहिल्यांदाच झाल्या मुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. रमेश मेगदे यांनी पाठविलेला कृतज्ञता संदेशही यावेळी वाचून दाखविण्यात आला. तसेच कमलाकर बिरादार, नरेश दंडवते, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, नकुल जैन,श्रीराम मोटरगे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप ठाकूर यांच्या विविध नव्वद उपक्रमात सहकार्य करणारे अन्नदाते व देणगीदारांच्या गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे १९९५ पासून ॲड. दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने नांदेडमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याची परंपरा सातत्याने जपत आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचे आठ आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाचे दहा असे एकूण अठरा विश्वचषक स्पर्धांचे सामने त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले आहेत. २००७ व २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच २००७, २०२४ व २०२५ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजनही केले होते. रोमहर्षक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्याने कुसुम सभागृह खचाखच भरले होते. भव्य आणि स्पष्ट प्रक्षेपणामुळे उपस्थितांना स्टेडियममध्ये बसल्याचा अनुभव मिळत होता. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकाराला जोरदार दाद मिळत होती, तर न्यूझीलंडचे खेळाडू बाद होताच घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी भांगडा करत आनंद साजरा केला. उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. सामना संपल्यानंतर महेश देबडवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शहरातून दुचाकी रॅली काढून तिरंगा हातात घेऊन उत्साहात जल्लोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, उमेश बडगे,गोपीचंद पांडागळे, सागर कळसकर,संभाजी बस्वदे यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून क्रीडारसिकांसाठी मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देत असल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर तसेच यावेळी पुढाकार घेतल्याबद्दल अमर राजुरकर यांचे क्रिकेटप्रेमींनी विशेष कौतुक केले.

23 hrs ago
user_Info news
Info news
Nanded, Maharashtra•

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    1
    हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by Info news
    1
    Post by Info news
    user_Info news
    Info news
    Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    17 hrs ago
  • नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे: नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला * जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले * आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचा संदेश या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.
    4
    नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे:
नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला
विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग
नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला 
* जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले
* आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
महत्त्वाचा संदेश
या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला
एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by Press Mukhed Bablu Mulla
    2
    Post by Press Mukhed Bablu Mulla
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    1
    महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.