आगाराने आकात पेट्रोलपंप थांबा केला पर्मनंट रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची होतेय फरफट परतूर - मंठा,सेलू, वाटूर मार्गे जाणाऱ्या बस आकात पेट्रोल पंपावरून वळविल्या जात असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे.बस आगाराच्या या भूमिकेने प्रवाशातून नाराजीचे सूर निघत आहेत. परतूर आगाराच्या सर्व बस रेल्वे स्टेशन बस थांबा घेऊनचं पूर्वी जात असायच्या मध्यंतरी शेगाव पंढरपूर महामार्गाच्या कामामुळे रेल्वे स्टेशन थांबा बंद झालेला होता . वाटूर,सेलू मार्गे जात असलेल्या बस आकात पेट्रोल पंपावरून तात्पुरत्या वळवण्यात आल्या होत्या.परंतु महामार्गाचे काम झाल्यानंतर त्या परत रेल्वे स्टेशन थांबा घेणे अपेक्षित असतांना, आगार व्यवस्थापक यांनी मात्र यात बदल न करता अद्यापही या बस आकात पेट्रोल पंपावरून वाटूर सेलू कडे जात आहेत. मुंबई,नासिक,ठाणे येथे मंठा , वाटूर भागातील गोरगरीब वर्ग काम धंद्यासाठी मोठ्या संख्येने जातो. त्यांना परतूर रेल्वे स्टेशन वर उतरल्यानंतर आकात पेट्रोल पंपापर्यंत लहान मुले, सामान घेऊन पायपीट करावी लागते. आकात पेट्रोल पंपाजवळ या प्रवाशांना थांबण्याची व्यवस्था नाही,पाऊस, ऊन,वारे यामुळे त्यांची होणारी फजिती पाहण्यासारखी असते. पोटात चहा,भजे घालायचे म्हंटले तर याठिकाणी तीही सोय नाही. अनेकवेळा प्रवाशांनी केवळ ५००मीटर लांब असलेल्या रेल्वे स्टेशन पर्यंत बसची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करूनही त्याकडे परतूर आगार व्यवस्थापक का दुर्लक्ष करतात हे न समजण्या पलीकडे आहे."बहुजन सुखाय बहुजन हिताय "असे ब्रीदवाक्य असणाऱ्या महामंडळाने ही छोटीसी पण त्रासदायक समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- आष्टी ता परतूर येथे शेख बाबू दर्गाचे तीन कोटी एक लक्ष रुपयाचे लोकार्पण करताना माजी मंत्री तथा विद्यमान #आमदार_बबनराव_लोणीकर_साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश सचिव #राहुलभैय्या_लोणीकर MLA Babanrao Lonikar - आमदार बबनराव लोणीकर Rahul Babanrao Lonikar1
- चाकणसारख्याच औद्योगिक वसाहती गुजरातला पळवणे व तेथील समस्यांवर तोडगा न काढता दुर्लक्ष करणे हेच महायुतीचे धोरण आहे. गोरगरीबांच्या तोंडाचा घास हिसकावून व स्वतःचा वैयक्तिक फायद्यासाठी महायुती सरकार महाराष्ट्राला ओरबाडून खात आहे. महाराष्ट्रातल्या अशा आणखी इंडस्ट्रीज राज्याबाहेर जाण्याआधीच मायबाप जनतेने सावध व्हावं.1
- महायुतीचे महाराष्ट्राला ओरबाडणे सुरूच ! चाकणमधील कंपन्यांचे स्थलांतर होत असताना देखील सरकारचे कंपन्यांकडे दुर्लक्ष आहे. हे महायुती सरकार फक्त बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त आहे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्राला ओरबडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.1
- Post by Jatin agnihotri1
- #mantha ...1
- 💖रेणुका 💫 माता 💕संस्थान 🥺मंठा 🙏🙏1
- हिवर्डी ता.जालना श्री.प्रभाकर बबनराव चोरमारे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मदत केल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. मतदार संघातील प्रत्येक रुग्णासाठी सदैव कटिबद्ध !1
- घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालय,नाटयगृह इमारती व राणीउंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमातरतीचे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वास्तु पूजन सोहळा संक्षिप्त व्हिडिओ..1