logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थिनिंनी मारली बाजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थिनिंनी मारली बाजी सोयगाव / प्रतिनिधी फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १०वी च्मा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कै. बाबूरावजी काळे मराठी स्कुलचे २४ पैकी २२ विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के असून यंदाही १६ टक्के निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. कु. मृणाल गणेश मानकर ही ९९.४०% गुण मिळवून प्रथम, कु. जिज्ञा राजू दुतोंडे ९९.२०% गुण मिळवून द्वितीय आणि कु. प्रतिक्षा विजय पगारे ही ८८.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई काळे, प्राचार्य डॉ. राजेश यादव, मुख्याध्यापक नितेश पाटील, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस, पर्यवेक्षक सागर घाटे, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

1 hr ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
1 hr ago

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थिनिंनी मारली बाजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थिनिंनी मारली बाजी सोयगाव / प्रतिनिधी फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १०वी च्मा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कै. बाबूरावजी काळे मराठी स्कुलचे २४ पैकी २२ विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के असून यंदाही १६ टक्के निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. कु. मृणाल गणेश मानकर ही ९९.४०% गुण मिळवून प्रथम, कु. जिज्ञा राजू दुतोंडे ९९.२०% गुण मिळवून द्वितीय आणि कु. प्रतिक्षा विजय पगारे ही ८८.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई काळे, प्राचार्य डॉ. राजेश यादव, मुख्याध्यापक नितेश पाटील, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस, पर्यवेक्षक सागर घाटे, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

More news from Sillod and nearby areas
  • हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
    1
    हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    6 hrs ago
  • पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    1
    पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध

आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    12 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    1
    महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. ​शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. ​शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा
येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे.
​शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
​शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    59 min ago
  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांची वहिवाट बंद करता येणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे पारंपरिक वहिवाटीचे हक्क कायम राहतील.
    1
    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांची वहिवाट बंद करता येणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे पारंपरिक वहिवाटीचे हक्क कायम राहतील.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    12 hrs ago
  • मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
    2
    मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल 

प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली.
स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    1
    ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.