logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बनावट नंबर प्लेट, ई-चलान मॅसेज आणि १० चोरीच्या ऑटो रिक्षांचा पर्दाफाश, याबाबत सविस्तर असे की, हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर अचानक वाशीम आणि मालेगाव परिसरात झालेला ई-चलानचा मेसेज आला. विशेष म्हणजे, आपली रिक्षा तर स्वतःजवळ असतांना वाशीममध्ये आपल्या ऑटो नंबरवर दंड कसा काय कापला गेला? या शंकेने मूळ मालक चक्रावला. त्याने ही बाब तात्काळ वाशीम मधील पोलिस अंमलदार विठ्ठल महाले यांच्या कानावर घातली. महाले यांनी लगेच त्या ऑटोचा फोटो मागवून घेतला. तपास केला असता एक धक्कादायक बाब समोर आली. रिक्षा भलतीच होती, पण नंबरप्लेट मात्र हिंगोलीच्या त्या मूळ मालकाची वापरली जात होती. याच दरम्यान वाशीम तालुयातील एका दुसर्‍या इसमाच्या मोबाईलवरही असाच ई-चलानचा मेसेज आला. त्यालाही फोटो दाखवला असता त्याने स्पष्ट सांगितले, हा ऑटो माझा नाही, पण यावर असलेला नंबर माझ्या जुन्या ऑटोचा आहे. पोलिसांनी याबाबत गुप्त तपास केला असता वाशीम शहरातील शुक्रवारी पेठ, इनामदारपुरा येथील रहिवासी दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याच्याकडे ऑटो असल्याचे समोर आले. पथकाने घुगे याच्या घरावर छापा टाकला असता तब्बल १० ते १२ ऑटो रिक्षा उभ्या असलेल्या पाहून पोलिस चक्रावले.पोलिसी खाया दाखवताच आरोपीने ऑटो चोरीचे असल्याचे सांगीतले.e challan पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या असून, आरोपी दादाराव घुगे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशन वाशीम शहर येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस विभागीय अधिकारी रामकृष्ण पवार, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोहेकॉ गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, पोलिस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.

5 hrs ago
user_के.के. रिपोर्टर
के.के. रिपोर्टर
Spa रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
5 hrs ago
c5d11e05-1042-4320-9c48-d490ed0e2a74

बनावट नंबर प्लेट, ई-चलान मॅसेज आणि १० चोरीच्या ऑटो रिक्षांचा पर्दाफाश, याबाबत सविस्तर असे की, हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर अचानक वाशीम आणि मालेगाव परिसरात झालेला ई-चलानचा मेसेज आला. विशेष म्हणजे, आपली रिक्षा तर स्वतःजवळ असतांना वाशीममध्ये आपल्या ऑटो नंबरवर दंड कसा काय कापला गेला? या शंकेने मूळ मालक चक्रावला. त्याने ही बाब तात्काळ वाशीम मधील पोलिस अंमलदार विठ्ठल महाले यांच्या कानावर घातली. महाले यांनी लगेच त्या ऑटोचा फोटो मागवून घेतला. तपास केला असता एक धक्कादायक बाब समोर आली. रिक्षा भलतीच होती, पण नंबरप्लेट मात्र हिंगोलीच्या त्या मूळ मालकाची वापरली जात होती. याच दरम्यान वाशीम तालुयातील एका दुसर्‍या इसमाच्या मोबाईलवरही असाच ई-चलानचा मेसेज आला. त्यालाही फोटो दाखवला असता त्याने स्पष्ट सांगितले, हा ऑटो माझा नाही, पण यावर असलेला नंबर माझ्या जुन्या ऑटोचा आहे. पोलिसांनी याबाबत गुप्त तपास केला असता वाशीम शहरातील शुक्रवारी पेठ, इनामदारपुरा येथील रहिवासी दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याच्याकडे ऑटो असल्याचे समोर आले. पथकाने घुगे याच्या घरावर छापा टाकला असता तब्बल १० ते १२ ऑटो रिक्षा उभ्या असलेल्या पाहून पोलिस चक्रावले.पोलिसी खाया दाखवताच आरोपीने ऑटो चोरीचे असल्याचे सांगीतले.e challan पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या असून, आरोपी दादाराव घुगे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशन वाशीम शहर येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस विभागीय अधिकारी रामकृष्ण पवार, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोहेकॉ गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, पोलिस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    7 hrs ago
  • साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    1
    साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय!

१० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे.  सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    1
    कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. 
सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
    1
    जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी

जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 min ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    2
    *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास*

वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.