मातृभूमी विद्या संकुल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा मातृभूमी विद्या संकुल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा उदगीर (प्रतिनिधी) स्थानिक मातृभूमी विद्या संकुल येथे १ मे 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यात आले. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश रे. उस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी यांची देखील सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्या संकुलांतर्गत येणाऱ्या मातृभूमी महाविद्यालय, मातृभूमी नर्सिंग स्कूल, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी व विविध विभागांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, वंदेमातरम आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. यावेळी श्री. सतीश उस्तुरे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून, राज्याच्या प्रगतीत तरुणांच्या योगदानावर प्रकाश टाकला. प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रणजीत मोरे ,प्रा.उस्ताद सय्यद, प्रा.शिवांगी वट्टमवार, प्रा.अन्वेष हिपळगावकर, प्रा.दीक्षा स्वामी, प्रा.राहुल जाधव, प्रा.नेहा वाघमारे, प्रा.मीरा पाटील , जगदीशा ओंकारे, अश्विनी काळे , दयानंद टाके, विवेक देवर्षी, मयूर मुळे, श्री.पटेल मुबारक व अर्चना बिरादार या सर्वानी परिश्रम घेतले.
मातृभूमी विद्या संकुल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा मातृभूमी विद्या संकुल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा उदगीर (प्रतिनिधी) स्थानिक मातृभूमी विद्या संकुल येथे १ मे 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यात आले. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश रे. उस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी यांची देखील सन्माननीय
उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्या संकुलांतर्गत येणाऱ्या मातृभूमी महाविद्यालय, मातृभूमी नर्सिंग स्कूल, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी व विविध विभागांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, वंदेमातरम आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. यावेळी श्री. सतीश उस्तुरे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून, राज्याच्या प्रगतीत तरुणांच्या योगदानावर प्रकाश टाकला. प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी
देखील या सोहळ्याला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रणजीत मोरे ,प्रा.उस्ताद सय्यद, प्रा.शिवांगी वट्टमवार, प्रा.अन्वेष हिपळगावकर, प्रा.दीक्षा स्वामी, प्रा.राहुल जाधव, प्रा.नेहा वाघमारे, प्रा.मीरा पाटील , जगदीशा ओंकारे, अश्विनी काळे , दयानंद टाके, विवेक देवर्षी, मयूर मुळे, श्री.पटेल मुबारक व अर्चना बिरादार या सर्वानी परिश्रम घेतले.
- Post by नागनाथ ससाने1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!1
- लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1