logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू अहमदपूर पोलीस कडून जप्त अहमदपूर पोलिसांनी हाडोळती येथे सापळा लावून पकडला २ लाख ७० हजारांचा सुगंधित गुटखा; एका आरोपीला अटक अहमदपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांच्या आणि गुटख्याच्या अवैध विक्री विरोधात अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळकोटहून अहमदपूरकडे कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सापळा लावून एका कारसह १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. शिरूर ताजबंद येथे गस्त घालत असताना, जळकोट बाजूकडून एका पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कारमध्ये (क्र. एम.एच.१२ एल.पी.५७५०) प्रतिबंधित गुटखा येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास नाकेबंदी केली. संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये पांढऱ्या व खाकी पोत्यात लपवून ठेवलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.​या कारवाईत १ लाख २४ हजार ८०० रुपयांचा विमल पानमसाला, ३१ हजार २०० रुपयांची व्ही-१ तंबाखू, १४ हजार ४०० रुपयांचा डायरेक्टर स्पेशल मसाला व तंबाखू आणि १ लाख रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कार चालक आल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३० वर्षे, रा. मारवाडी गल्ली, अहमदपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हवालदार तानाजी आरदवाड, गंगाधर चपडे, हरी कांबळवाड , दत्तात्रय इंदाळे,विशाल सारोळे ,पद्माकर पांचाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

4 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
0c1f8850-5ac4-4518-b60f-309b794a4aad

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू अहमदपूर पोलीस कडून जप्त अहमदपूर पोलिसांनी हाडोळती येथे सापळा लावून पकडला २ लाख ७० हजारांचा सुगंधित गुटखा; एका आरोपीला अटक अहमदपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांच्या आणि गुटख्याच्या अवैध विक्री विरोधात अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळकोटहून अहमदपूरकडे कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सापळा लावून एका कारसह १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. शिरूर ताजबंद येथे गस्त घालत असताना, जळकोट बाजूकडून एका पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कारमध्ये (क्र. एम.एच.१२ एल.पी.५७५०) प्रतिबंधित गुटखा येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास नाकेबंदी केली.

93610441-a767-4364-a88b-be1e158b2c13

संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये पांढऱ्या व खाकी पोत्यात लपवून ठेवलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.​या कारवाईत १ लाख २४ हजार ८०० रुपयांचा विमल पानमसाला, ३१ हजार २०० रुपयांची व्ही-१ तंबाखू, १४ हजार ४०० रुपयांचा डायरेक्टर स्पेशल मसाला व तंबाखू आणि १ लाख रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कार चालक आल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३० वर्षे, रा. मारवाडी गल्ली, अहमदपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हवालदार तानाजी आरदवाड, गंगाधर चपडे, हरी कांबळवाड , दत्तात्रय इंदाळे,विशाल सारोळे ,पद्माकर पांचाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कु्र थट्टा. किडीज इन्फो पार्क शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर धाब्यावर तपासण्याचा नवीन प्रताप. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. लातूर हे महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतात शिक्षणासाठी पंढरी मानली जाणाऱ्या लातूर पॅटर्न या नावाने प्रसिद्ध असलेले शहर अशी ओळख आहे पण अलीकडे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे खाजगी क्लास चालक त्यांचे एजंट व भ्रष्ट अधिकाऱ्याचे नातेवाईक हे आपल्या पदाचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन पेपर बाहेर धाब्यावर दारू पीत सिगरेट घेत नशा पाणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धाब्यावर बसून पेपर तपासत आहेत. धाब्यावर बसून विद्यार्थ्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे असताना जबाबदार शिक्षणाधिकारी यांची डोळे झाक आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. यातील काही व्यक्ती ही जबाबदार अधिकाऱ्याची अत्यंत जवळची व्यक्ती आहेत जे विद्यार्थी दिवस-रात्र डोळे फोडून अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय नाही का? जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर यावर लक्ष घालून जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे त्यावर कडक ॲक्शन घ्यावी असे नागरिकांच्या चर्चेतून माहिती मिळत आहे.
    1
    लातूरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कु्र थट्टा.
किडीज इन्फो पार्क शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर धाब्यावर तपासण्याचा नवीन प्रताप. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026.
लातूर हे महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतात शिक्षणासाठी पंढरी मानली जाणाऱ्या लातूर पॅटर्न या नावाने प्रसिद्ध असलेले शहर अशी ओळख आहे पण अलीकडे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे खाजगी क्लास चालक त्यांचे एजंट व भ्रष्ट अधिकाऱ्याचे नातेवाईक हे आपल्या पदाचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन पेपर बाहेर धाब्यावर दारू पीत सिगरेट घेत नशा पाणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धाब्यावर बसून पेपर तपासत आहेत. धाब्यावर बसून विद्यार्थ्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे असताना जबाबदार शिक्षणाधिकारी यांची डोळे झाक आहे का? हे पाहणं गरजेचं आहे.
यातील काही व्यक्ती ही जबाबदार अधिकाऱ्याची अत्यंत जवळची व्यक्ती आहेत जे विद्यार्थी दिवस-रात्र डोळे फोडून अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय नाही का? जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर यावर लक्ष घालून जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे त्यावर कडक ॲक्शन घ्यावी असे नागरिकांच्या चर्चेतून माहिती मिळत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    55 min ago
  • लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले
    1
    लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले
    1
    सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    1
    आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    5
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    1
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष!
हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
#DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    45 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर एमआयडीसीतील मुंदडा अल्युमिनियम कारखान्याला भीषण आग दोन जण गंभीरित्या भाजून जखमी. काही कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. लातूर शहरातील एमआयडीसी इरीयातील मुंदडा यांचे ॲल्युमिनियम चा कारखाना असून या कारखान्यात ॲल्युमिनियमचे सर्व प्रकारचे साहित्य उत्पादन करण्याचे काम चालू असताना अचानक ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याने या आगीत दोन जण गंभीरित्या भाजल्याने जखमी झाल्याची माहिती आणि काही कामगार अडकल्याचे देखील या ठिकाणी कळत आहे. अग्निशामक यांना पाचारण करण्यात आले आहे आग विझवण्याचे कार्य चालू असून या ठिकाणी धुराचा लोळ उठत आहे आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
    2
    लातूर एमआयडीसीतील मुंदडा अल्युमिनियम कारखान्याला भीषण आग दोन जण गंभीरित्या भाजून जखमी. काही कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026.
लातूर शहरातील एमआयडीसी इरीयातील मुंदडा यांचे ॲल्युमिनियम चा कारखाना असून या कारखान्यात ॲल्युमिनियमचे सर्व प्रकारचे साहित्य उत्पादन करण्याचे काम चालू असताना अचानक ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याने या आगीत दोन जण गंभीरित्या भाजल्याने जखमी झाल्याची माहिती आणि काही कामगार अडकल्याचे देखील या ठिकाणी कळत आहे. अग्निशामक यांना पाचारण करण्यात आले आहे आग विझवण्याचे कार्य चालू असून या ठिकाणी धुराचा लोळ उठत आहे आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.