ताडोबातील वीरा वाघीण बनली तेरा बछड्याची माता, तीन बछड्यांना दिला जन्म ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पळसगाव बफर वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘विरा’ ही वाघीण आपल्या चौथ्या प्रसूतीत तीन गोंडस बछड्यांसह आढळून आली आहे. आतापर्यंत तिने तब्बल तेरा बछड्यांना जन्म देत ताडोबा परिसरातील व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नव्या बछड्यांच्या आगमनामुळे पळसगाव जंगल परिसरात उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराने पहिल्यांदा बेलारा-गोंडमोहाळी जंगल परिसरात दोन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रसूतीमध्ये प्रत्येकी चार बछड्यांची भर पडली. आता चौथ्यांदा पळसगाव जंगल परिसरात तिने तीन बछड्यांना जन्म दिल्याने तिच्या एकूण अपत्यांची संख्या तेरा झाली आहे. जंगलातील बदलत्या परिस्थितीत सातत्याने आपल्या पिल्लांचे संगोपन करणारी विरा ही अनुभवी आणि सक्षम वाघीण म्हणून ओळखली जात आहे. सध्या विरा आपल्या तीन लहान बछड्यांसह अत्यंत सावधपणे जंगल परिसरात वावरताना दिसून येत आहे. बछडे अजून लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ती अधिक सतर्क झाली असून सुरक्षित अधिवास, पाण्याची उपलब्धता आणि भक्ष्यांची मुबलकता असलेल्या परिसरात तिचा मुक्काम असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. ताडोबा परिसरात गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या सातत्याने वाढत असून त्यामागे विरासारख्या सक्षम वाघिणींचे मोठे योगदान असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. विशेष म्हणजे विराच्या नव्या बछड्यांचे फोटो आणि हालचालींची माहिती समोर येताच वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पळसगाव बफर क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले असून पर्यटनाच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व वाढले आहे. झुनाबाई आणि कंनकाझरीची कन्या ‘विरा’ विराचा जन्म मदनापूर पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण ‘झुनाबाई’ आणि रुबाबदार नर वाघ ‘कंनकाझरी’ यांच्या पोटी झाला होता. बेलारा गेट परिसरातील प्रसिद्ध नर वाघ ‘झायलो’ हा विराचा जोडीदार मानला जातो. तसेच झुनाबाईचा पुत्र ‘पुष्पा’ वाघाचाही याच परिसरात वावर असल्याने हा संपूर्ण जंगल पट्टा सध्या वाघांच्या उपस्थितीमुळे समृद्ध बनला आहे.ताडोबा परिसरातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण या जंगलाकडे वाढत आहे. विशेषतः बफर क्षेत्रात वाघांचे सहज दर्शन घडत असल्याने पळसगाव, बेलारा आणि गोंडमोहाळी परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे समोर येत आहेत. वनविभाग सतर्क “पळसगाव वनपरिक्षेत्रात विरा वाघीण तीन बछड्यांसह आढळून आली आहे. विराने आतापर्यंत तेरा बछड्यांना जन्म देणे ही ताडोबा परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. बछड्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क असून नागरिकांनी जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळून वनविभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन पळसगाव बफरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी केले आहे.

- डॅशिंग महिला तहसीलदार यांची बेधडक कारवाई, वाळू तस्करांचे धाबे दणाणले देशमुखवाडी (ता. आटपाडी) परिसरातील माण नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी जप्त केला. जप्त केलेले वाहन पुढील कार्यवाहीसाठी आटपाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार आणि प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. देशमुखवाडी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही नियोजनबद्ध कारवाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर महसूल विभागाचे पथक माण नदीपात्रात दाखल झाले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरला जाणारा जेसीबी आढळून आला. प्रशासनाचे वाहन दिसताच चालकाने जेसीबी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल कर्मचारी आणि पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून हे वाहन ताब्यात घेतले. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील, विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप, प्रशांत जाधव तसेच पोलिस कॉन्स्टेबल कोळेकर यांनी सहभाग घेतला. तस्करांचे धाबे दणाणले तहसीलदार शीतल बंडगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे वाळू तस्करांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा धडक मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.1
- विसापूर तालुका तासगाव ज्योतिबा राजा यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा म्हणजे भक्ती परंपरा आणि उत्साह महासंगम आहे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या आनंदाने भक्तीचा आनंद फुल आहे. उंच हत्ती घोडे लेझीम झांज सनई चौघडे यांचे सह विसापूर परिसरातील सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने आनंदाने मिरवणुकीत सहभागी झाले पहा मिरवणुकीचा सोहळा कॅमेरा मध्ये3
- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- सांगली पोलिसांनी नागठाणे परिसरातून एका अट्टल गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. तपासणीत त्याच्याकडे कोणताही परवाना नसून त्याने हे पिस्तूल जत येथील एका व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी पुढील तपास 'जत कनेक्शन'च्या दिशेने सुरू असून आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे.2
- मनसेने कोल्हापूरमध्ये 'बळीराजा आक्रोश आंदोलन' करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर चिंता व्यक्त करत, आंदोलकांनी महसूलमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.2
- आजचे राशीभविष्य तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे ते जाणून घ्या. बारा राशींचे विस्तृत भविष्य येथे वाचा, जे तुम्हाला तुमच्या दिवसाची योजना बनविण्यात मदत करेल.1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने पाटील दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. सदर तक्रारीची प्रत मा. जिल्हाधिकारी, सांगली यांनाही देण्यात आलेली आहे. असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने पाटील यांनी इशारा दिला आहे त्याबाबत निवेदनही दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही अथवा चौकशी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे जनतेमध्ये व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपणास पुन्हा एकदा हे स्मरणपत्र स्वरूपाचे निवेदन सादर करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. विजयकुमार वाघ यांनी अनेक निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवहार व प्रशासकीय कामकाजामध्ये गंभीर अनियमितता केल्याची चर्चा असून त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे. त्याबाबत खालील मुद्द्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. १) डोंगल खरेदी प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार : आरोग्य विभागाच्या वेबसाईटसाठी आवश्यक डोंगल खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारातील प्रचलित दर आणि प्रत्यक्ष खरेदी केलेले दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. संबंधित खरेदी प्रक्रिया, निविदा अटी, पुरवठादारांची निवड व आर्थिक मंजुरी यांची कसून चौकशी करण्यात यावी. २) महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक दबाव व आर्थिक शोषण : शासकीय सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच सीएचओ कर्मचाऱ्यांचे इन्सेंटिव्ह भत्ते मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १५०० रक्कम घेतली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. बीएएमएस मेडिकल ऑफिसर यांच्या ११ महिन्यांच्या करारानंतर नव्याने आदेश काढण्यासाठी एका महिन्याचा पगार घेतला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणाची गोपनीय व निष्पक्ष चौकशी व्हावी. ३) 'टीबी मुक्त अभियान' अंतर्गत निधी गैरवापराचा संशय : शासकीय "१०० डेज कार्यक्रम" अंतर्गत राबविण्यात आलेल्या टीबी मुक्त अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या सुमारे ११ कोटी ४ लाख निधीच्या खर्चाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी. तसेच प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आलेले ११५,००० हे निधी त्या स्तरावर खर्च होणे अपेक्षित असताना संबंधित रक्कम सीएचए कर्मचाऱ्यांकडून धनादेशाद्वारे परत घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका मुद्रणालयातून स्टेशनरी खरेदी करून त्याच्या पावत्या जिल्ह्यातील उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे स्वतःची मुद्रण व्यवस्था उपलब्ध असताना जिल्ह्याबाहेरून खरेदी का करण्यात आली, हा गंभीर संशयाचा विषय आहे. सुमारे ४५ लाखांहून अधिक रकमेच्या खर्चातून निकृष्ट दर्जाचे व अनावश्यक साहित्य उपकेंद्रांना पुरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याऐवजी सर्व निधी एकत्रित करून एकाच प्रिंटिंग प्रेसमार्फत साहित्य खरेदी करण्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी होणे आवश्यक आहे.महोदय, सांगली जिल्हा परिषदेची गौरवशाली परंपरा व जनतेचा विश्वास कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. काही भ्रष्ट व संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषर्षीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे1