वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने पाटील दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. सदर तक्रारीची प्रत मा. जिल्हाधिकारी, सांगली यांनाही देण्यात आलेली आहे. असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने पाटील यांनी इशारा दिला आहे त्याबाबत निवेदनही दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही अथवा चौकशी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे जनतेमध्ये व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपणास पुन्हा एकदा हे स्मरणपत्र स्वरूपाचे निवेदन सादर करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. विजयकुमार वाघ यांनी अनेक निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवहार व प्रशासकीय कामकाजामध्ये गंभीर अनियमितता केल्याची चर्चा असून त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे. त्याबाबत खालील मुद्द्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. १) डोंगल खरेदी प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार : आरोग्य विभागाच्या वेबसाईटसाठी आवश्यक डोंगल खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारातील प्रचलित दर आणि प्रत्यक्ष खरेदी केलेले दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. संबंधित खरेदी प्रक्रिया, निविदा अटी, पुरवठादारांची निवड व आर्थिक मंजुरी यांची कसून चौकशी करण्यात यावी. २) महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक दबाव व आर्थिक शोषण : शासकीय सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच सीएचओ कर्मचाऱ्यांचे इन्सेंटिव्ह भत्ते मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १५०० रक्कम घेतली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. बीएएमएस मेडिकल ऑफिसर यांच्या ११ महिन्यांच्या करारानंतर नव्याने आदेश काढण्यासाठी एका महिन्याचा पगार घेतला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणाची गोपनीय व निष्पक्ष चौकशी व्हावी. ३) 'टीबी मुक्त अभियान' अंतर्गत निधी गैरवापराचा संशय : शासकीय "१०० डेज कार्यक्रम" अंतर्गत राबविण्यात आलेल्या टीबी मुक्त अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या सुमारे ११ कोटी ४ लाख निधीच्या खर्चाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी. तसेच प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आलेले ११५,००० हे निधी त्या स्तरावर खर्च होणे अपेक्षित असताना संबंधित रक्कम सीएचए कर्मचाऱ्यांकडून धनादेशाद्वारे परत घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका मुद्रणालयातून स्टेशनरी खरेदी करून त्याच्या पावत्या जिल्ह्यातील उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे स्वतःची मुद्रण व्यवस्था उपलब्ध असताना जिल्ह्याबाहेरून खरेदी का करण्यात आली, हा गंभीर संशयाचा विषय आहे. सुमारे ४५ लाखांहून अधिक रकमेच्या खर्चातून निकृष्ट दर्जाचे व अनावश्यक साहित्य उपकेंद्रांना पुरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याऐवजी सर्व निधी एकत्रित करून एकाच प्रिंटिंग प्रेसमार्फत साहित्य खरेदी करण्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी होणे आवश्यक आहे.महोदय, सांगली जिल्हा परिषदेची गौरवशाली परंपरा व जनतेचा विश्वास कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. काही भ्रष्ट व संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषर्षीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे

- जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.1
- रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाच्या ठेकेदाराने केलेल्या कामातील चुकीमुळे एक संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.1
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते1
- राहुल गांधींसारखा 'बुद्धू' राजकारणी मी पाहिला नाही; नारायण राणेंचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राहुल गांधींना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान असून त्यांच्यासारखा 'बुद्धू' राजकारणी मी आजवर पाहिला नाही," अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेचे अज्ञान आणि राहुल गांधींवर टीका पंतप्रधानांच्या विधानावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे म्हणाले की, जेव्हा एखादा देश आयात कमी करतो आणि निर्यात वाढवतो, तेव्हाच त्याची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जीडीपी वाढतो. हे साधे गणित राहुल गांधींना समजत नाही. "लोकसभेत राहुल गांधी ज्या प्रकारे वावरतात आणि बोलतात, त्यावरून त्यांना पंतप्रधानांशी कसं बोलायचं हे देखील कळत नाही. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत काही चांगलं केलं असतं, तर आज त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था झाली नसती," असेही राणे म्हणाले. तसेच, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपने बाहेर काढल्यामुळे आता त्यांना शहाणपण सुचत असून, त्यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. इंधन बचत: पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याचे राणेंनी स्वागत केले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची समस्या ही देशापुढील मोठी समस्या आहे. मंत्री स्वतःहून गाड्यांची मागणी करत नाहीत, तर सुरक्षा व्यवस्थेनुसार ताफा दिला जातो. मात्र, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन योग्य असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. राजू शेट्टींच्या आंदोलनावर टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी १५ मे रोजी 'वर्षा' बंगल्यावर काढणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना राणे यांनी त्यांना टोला लगावला. शेट्टींचे काम: "राजू शेट्टींना आंदोलनाशिवाय दुसरे काहीच माहित नाही. ते ना शेती करतात, ना धंदा. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते आंदोलन करतात," असे राणे म्हणाले. शेतकरी मदत: कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही निधी मंजूर केला आहे. ही मदत शेवटची नसून जून महिन्यात ती वाढवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, राजू शेट्टी माझे मित्र आहेत आणि त्यांना योग्य वेळी मी नक्कीच सल्ला देईन, असेही राणे यांनी मिश्किलपणे नमूद केले.1
- माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप1
- युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.1
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींची हवा काढल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यापूर्वी पार्किंग शिस्त लावण्यासाठी त्यांनी हे कडक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.1