Shuru
Apke Nagar Ki App…
वृक्षारोपण करा निसर्गाचा समतोल राखा,झाडे जगवा झाडे वाचवा..
Swal Jansamannyaca ...
वृक्षारोपण करा निसर्गाचा समतोल राखा,झाडे जगवा झाडे वाचवा..
More news from Maharashtra and nearby areas
- नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो, मुंबई में गार्ड्स पर चाकू से हमला मीरा रोड के नया नगर में गार्ड्स पर चाकू से हमला हुआ. आरोपी ने पहले नाम और धर्म पूछकर वार किया. एक गार्ड गंभीर रूप से घायल हुआ. पुलिस ने सीसीटीवी के आधार पर आरोपी जैब अंसारी को डेढ़ घंटे में गिरफ्तार कर लिया. मामले की जांच एटीएस के साथ मिलकर की जा रही है. मुंबई के पास मीरा रोड के नया नगर इलाके में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक शख्स ने सुरक्षा गार्ड्स पर चाकू से हमला कर दिया. बताया जा रहा है कि आरोपी ने पहले दोनों से उनका नाम और धर्म पूछा और यह भी पूछा कि क्या वे कलमा पढ़ सकते हैं. इसके बाद उसने उन पर हमला कर दिया. यह घटना 27 अप्रैल 2026 की सुबह करीब 4 बजे की है. उस समय राजकुमार मिश्रा और सुब्रतो रमेश सेन मीरा रोड ईस्ट स्थित वॉकहार्ट अस्पताल के पीछे बन रही अस्मिता ग्रैंड बिल्डिंग के निर्माण स्थल पर सुरक्षा ड्यूटी पर तैनात थे. जानकारी के अनुसार, 31 वर्षीय जैब जुबैर अंसारी नाम का आरोपी वहां पहुंचा. उसने दोनों गार्ड्स से उनका नाम और धर्म पूछा. जब दोनों ने जवाब दिया तो आरोपी ने उनसे पूछा कि क्या वो कलमा पढ़ सकते हैं. दोनों के मना करने पर आरोपी ने अचानक चाकू निकाल लिया और हमला कर दिया. हमले में राजकुमार मिश्रा को गंभीर चोटें आईं. बताया जा रहा है कि उनके पेट के अंदरूनी हिस्सों तक चोट पहुंची है. वहीं सुब्रतो सेन को पीठ में हल्की चोटें आईं और वह हमले के दौरान किसी तरह केबिन में छिप गए.1
- Post by Labour addaa.1
- सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28. कृषी विभागाने प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स तयार करावे, पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज देवून शेतकऱ्यांची कोठेही अडवणूक - पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. येथील नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित करतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीस नगराध्यक्ष अब्दुल समीर , उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते ,उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव ,गटविकास अधिकारी रत्नाकर पगार ,न.प.चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार ,शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे ,उपसभापती संदीप राऊत ,जि.प.सदस्य देविदास पालोदकर ,सय्यद नासिर हुसेन, राजू बाबा काळे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे ,जयराम चिंचपुरे ,नानासाहेब रहाटे, भावराव पा. लोखंडे, पं.स.सदस्य शेख सलीम, समी चाउस, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे ,सयाजीराव वाघ, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, माजी सभापती रामदास पालोदकर, संजय डमाळे , दुर्गाबाई पवार, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे ,जि प सिंचन विभागाच्या उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके यांच्यासह न.प.तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर ,आसिफ बागवान , शेख इम्रान, अशोक बनसोड, सत्तार हुसेन, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, शेख सलीम हुसेन आदिंसह शासनाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख,कर्मचारी - शेतकरी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी खतांचा अवाजवी साठा व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देत नॅनो युरियाच्या वापरावर भर देण्यासह शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत कमी खर्चिक शेती पद्धतींचा विस्तार करण्यावरही त्यांनी भर दिला. पीक कर्जाच्या बाबतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा पिळवणूक करू नये, त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पिकांचा आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू ठेवावी, कृषी सहाय्यकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्याने व तात्काळ प्रतिसाद देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पिकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपापला कृती आराखडा पुढील सात दिवसांत सादर करावा व ठराविक जबाबदाऱ्या निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे त्यांनी बजावले. “नियोजनातील कसूर शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे गांभीर्याने पालन करून प्रभावी नियोजन करावे,” असे स्पष्ट मत आमदार सत्तार यांनी व्यक्त केले. याशिवाय “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुधन विकासासाठी सुयोग्य नियोजन करून शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. पोखरा टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर गावांमध्ये योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचे तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. ------------- “शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करताना नेहमीच अधिकृत व ओरिजिनल पावती घ्यावी, जेणेकरून फसवणुकीपासून संरक्षण मिळेल,” असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. बोगस बियाणे, चढ्या दराने विक्री आणि खतांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक राहणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ------------1
- जिल्ह्यात बॅंकेचा भ्रष्टाचार थांबत नाही बदनापूर कॅनरा बँकेच्या शाखेतून 7.5 कोटींचा तारण सोना गयाब1
- *धुळे :* जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ग्राहकाचे मीटर बदलल्याप्रकरणी कंपनीला 'सेवेतील त्रुटी' (Deficiency in Service) धरत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार रुपेश मराठे यांनी ॲड.महेश मराठे यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दि.२५ मे २०२५ रोजी ग्राहकाच्या अनुपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग न घेता आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमावलीचे पालन न करता त्यांचे वापरात असलेले वीज मीटर बदलले होते. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगाचे दार ठोठावले होते. आयोगाने याप्रकरणी महावितरणला नोटीस बजावली होती, मात्र कंपनीतर्फे कोणीही हजर न राहिल्याने हे प्रकरण एकतर्फा चालवून निकाली काढण्यात आले. आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, मीटर बदलताना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे आणि महावितरणने कोणतीही स्पष्टीकरण न देता किंवा कायदेशीर तरतुदी पाळल्याशिवाय केलेली ही कृती सेवा त्रुटी दर्शवते. या प्रकरणी आयोगाने तक्रारदार यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी एकूण आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश महावितरणला दिला आहे, ज्यामध्ये तीन हजार रुपये आर्थिक त्रासापोटी, तीन हजार रुपये शारीरिक व मानसिक त्रासापोटी आणि दोन हजार रुपये तक्रार अर्जाच्या खर्चापोटी आहेत. ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास, त्यावर सहा टक्के वार्षिक व्याजासह रक्कम देण्याची जबाबदारी महावितरणवर सोपवण्यात आली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना तक्रारदार यांचे वकील ॲड. महेश मराठे म्हणाले की, हा निकाल सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठा विजय आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार करणे चुकीचे आहे आणि हा निकाल अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा आहे. दरम्यान, धुळ्यातील ज्या नागरिकांचे वीज मीटर महावितरणने अशाच प्रकारे परस्पर बदलले आहेत किंवा ज्यांना या प्रकारच्या मनमानीचा फटका बसला आहे, त्यांनी घाबरून न जाता ॲड. महेश मराठे यांच्याशी संपर्क साधावा आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- बुलडाण्यात पोलिसांचा कडक पहारा; राजकीय संघर्षातून शहरात तणाव, आंदोलक अटकेत1
- *बुलढाण्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळाले. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखलीत रोखले आहे. दुसरीकडे, बुलढाणा शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले असून, आंदोलन दडपल्याचा आरोप आता केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली. निमित्त होते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला इशारा. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही संपूर्ण आंदोलनाची मोहीम चिरडून टाकली आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्याच्या दिशेने येत असताना, चिखली पोलिसांनी त्यांना वाटेतच गाठले. सध्या आंबी यांना चिखलीतील 'हॉटेल अमृततुल्य'मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले असून, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा गराडा तैनात आहे.दुसरीकडे, बुलढाणा शहरात परिस्थिती अधिकच स्फोटक झाली होती. प्रशांत आंबी यांच्या स्वागतासाठी आणि समर्थनासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी **'संजय गायकवाड मुर्दाबाद'**च्या जोरदार घोषणा दिल्या. "जोपर्यंत आंबी बुलढाण्यात येत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नाही," असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत उचलले आणि व्हॅनमध्ये भरून ताब्यात घेतले.या वादाची पार्श्वभूमी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाशी जोडली जात आहे. "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवू, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही," असा इशारा गायकवाडांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, परिणामी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.1
- .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!1
- गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.1