पद्मश्री रामसिंग भानावत यांचे कार्य जागतिक पातळीवर अधोरेखित – डॉ. पंडित चव्हाण मानोरा :-- बंजारा भाषा गौरव दिन पंधरवडा निमित्त आयोजित आभासी व्याख्यानमालेत १७ एप्रिल ला पद्मश्री स्व.रामसिंग भानावत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पोरियातारा टीचर्स अँड प्रोफेसर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. पंडित चव्हाण यांनी भानावत यांना जात-पोटजातींच्या चौकटीत न बसवता जागतिक दर्जाचे समाजसुधारक म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. रामसिंग भानावत यांनी शिक्षण, आरोग्य आणि संघटन क्षेत्रात मोलाचे कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांनीही घेतली होती. भारत सरकारच्या सहकार्याने त्यांनी अनेक देशांचा दौरा केला होता, यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते, असे चव्हाण यांनी नमूद केले. मुख्य वक्ते प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी भानावत यांच्या पुरोगामी विचारसरणीवर प्रकाश टाकताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचे कार्य सातत्याने सुरू ठेवले, असे सांगितले. तसेच, त्यांना समजून घेण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भानावत यांचे जावई तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी. के. नाईक यांनी त्यांच्या देश-विदेशातील कार्याचा अनुभव मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू रत्ने यांनी केले. सूत्रसंचालन सुग्रीव राठोड यांनी तर आभार प्रदर्शन पंतुसिंग जाधव यांनी केले.

- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Ahem Raza1
- Post by M B B1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.1
- अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.1