धावडा परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान धावडा परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान भोकरदन : विश्वास धसाळ भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात वनविभागाच्या हद्दीतून येणाऱ्या रानडुकरांच्या कळपामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. धावडा परिसरात वनविभागाची जवळपास शंभर एकर जमीन असून, या परिसरातील जंगलातून रानडुकरे शेतशिवारात दाखल होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. धावडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मका, सोयाबीनसह विविध पिकांची लागवड केली आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच रानडुकरांचे कळप शेतात घुसत आहेत. रानडुकरे पिकांची पाने व खोडे तोडून टाकत असून, अनेक ठिकाणी संपूर्ण पिके आडवी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः मक्याच्या पिकाला रानडुकरांचा मोठा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागत आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असले तरी मोठ्या संख्येने येणाऱ्या रानडुकरांसमोर या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे पिकांची लागवड करण्यासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च झाला आहे. तर दुसरीकडे तयार होत असलेल्या पिकांचे रानडुकरांकडून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई वेळेत आणि पुरेशी मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. धावडा परिसरातील वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये रानडुकरांचा वाढता वावर हा शेतकऱ्यांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. वनविभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे भविष्यात पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्याने वनविभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि वन्यजीवांचा अधिवास यामध्ये समतोल राखत प्रशासनाने या समस्येवर प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

- अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ1
- कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे #कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया #vidioviral #kanpur #cricketnews #Crime1
- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..1
- चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....1
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- बनावट पनीर प्रकरणात हॉटेलला उच्च न्यायालयाचा दणका; जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनीही धडा घ्यावा.. नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; उच्च न्यायालयाच्या भूमिकेतून जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी धडा घ्यावा – अॅड. महेश धन्नावत.. बनावट पनीर प्रकरणात हॉटेलला उच्च न्यायालयाचा दणका; जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनीही धडा घ्यावा.. नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; उच्च न्यायालयाच्या भूमिकेतून जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी धडा घ्यावा – अॅड. महेश धन्नावत.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना अस्सल पनीरच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे ‘अॅनालॉग पनीर’ खायला घातल्याप्रकरणी ठाण्यातील ‘उडुपी स्वाद’ हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हॉटेलचा परवाना निलंबित केल्याची कारवाई कायम ठेवत न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.1
- महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1