Shuru
Apke Nagar Ki App…
भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..1
- 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.2
- अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ1
- कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे #कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया #vidioviral #kanpur #cricketnews #Crime1
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,1
- बनावट पनीर प्रकरणात हॉटेलला उच्च न्यायालयाचा दणका; जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनीही धडा घ्यावा.. नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; उच्च न्यायालयाच्या भूमिकेतून जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी धडा घ्यावा – अॅड. महेश धन्नावत.. बनावट पनीर प्रकरणात हॉटेलला उच्च न्यायालयाचा दणका; जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनीही धडा घ्यावा.. नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; उच्च न्यायालयाच्या भूमिकेतून जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी धडा घ्यावा – अॅड. महेश धन्नावत.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना अस्सल पनीरच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे ‘अॅनालॉग पनीर’ खायला घातल्याप्रकरणी ठाण्यातील ‘उडुपी स्वाद’ हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हॉटेलचा परवाना निलंबित केल्याची कारवाई कायम ठेवत न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.1
- महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1