अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या बांधावर थेट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव; प्रशासनाला कडक इशारा – "पंचनाम्यात दिरंगाई चालणार नाही!" अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या बांधावर थेट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव; प्रशासनाला कडक इशारा – "पंचनाम्यात दिरंगाई चालणार नाही!" बुलढाणा | प्रतिनिधी ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या विक्राळ अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाण्याखाली गेलेली पिके, उद्ध्वस्त झालेली शेती आणि घरांची पडझड पाहून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले की, "पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवा आणि बाधितांना मदत वेळेत मिळालीच पाहिजे." गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रतापराव जाधव यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपत्कालीन उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत शेतपिके, शेती आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि "शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे," असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी कृषी, महसूल आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेती व घरांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत, मदत वितरणात कोणताही विलंब होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. पाहणीदरम्यान तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत; मदत तातडीने पोहोचली पाहिजे," असा ठाम संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या बांधावर थेट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव; प्रशासनाला कडक इशारा – "पंचनाम्यात दिरंगाई चालणार नाही!" अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या बांधावर थेट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव; प्रशासनाला कडक इशारा – "पंचनाम्यात दिरंगाई चालणार नाही!" बुलढाणा | प्रतिनिधी ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या विक्राळ अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाण्याखाली गेलेली पिके, उद्ध्वस्त झालेली शेती आणि घरांची पडझड पाहून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले की,
"पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवा आणि बाधितांना मदत वेळेत मिळालीच पाहिजे." गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रतापराव जाधव यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपत्कालीन उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत शेतपिके,
शेती आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि "शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे," असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी कृषी, महसूल आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेती व घरांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत, मदत वितरणात कोणताही विलंब होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. पाहणीदरम्यान तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत; मदत तातडीने पोहोचली पाहिजे," असा ठाम संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- महापुरुषांचे फोटो कचरा सारखे पडले धुळखात वनोजा ग्रामपंचायत कार्यालयात हि आहे ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होत आहे कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि याकडे प्रशासनान का दुर्लक्ष करत आहे ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्य जीवन जगत आहो ज्या महामानवामुळे गावात ग्रामपंचायत. कायदा.संविधान. सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार स्वतंत्र दिले आशा महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत किती लाजवनारी बाब आहे तेही ग्रामपंचायत मध्ये यावर शासन कारवाई करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालय रेकॉर्ड ग्रामसेवक साहेबांच्या घरी ग्रामपंचायत कार्यालय फक्त नावालाच ग्रामपंचायत वनोजा बाग येथील ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून दिसत नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आणुन देणार ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये रेकॉर्ड रजिस्टर असतात तरी कुठे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा गावात कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा बाग फक्त शोभेची वस्तू बनली आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती फलक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले नाहीत आणि नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये यायचं असेल तर ग्रामसेवक साहेब म्हणतात मला भेटायला अगोदर फोन करायचा अन्यथा नाही याकडे प्रशासनान लक्ष देईल का1
- 🚨 जळगांव से गुजरने वाले नेशनल हाईवे पर बड़ा अपडेट! ट्रैफिक रूट में अहम बदलाव, सफर से पहले जान लें ये जरूरी जानकारी1
- ३० जुलै च्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठा कहर केला या महापुराचा सर्वाधिक फटका प्रसिद्ध श्री संत सखाराम महाराज संस्थानला बसला असे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे पाहूया सविस्तर अहवाल ३० जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या महापुराचे पाणी थेट इलोरा येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानाच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात शिरले. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला. महापुराच्या वेगवान प्रवाहामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीही वाहून गेल्या. तसेच संस्थानची शेती पूर्णपणे खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. संस्थानच्या गोरक्षण विभागालाही या पुराचा मोठा फटका बसला. गुरांसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थानचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान, आज (१ ऑगस्ट) तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी महापुराच्या खुणा आणि नुकसानीचे चित्र अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदत प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1