३० जुलै च्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठा कहर केला या महापुराचा सर्वाधिक फटका प्रसिद्ध श्री संत सखाराम महाराज संस्थानला बसला असे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे पाहूया सविस्तर अहवाल ३० जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या महापुराचे पाणी थेट इलोरा येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानाच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात शिरले. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला. महापुराच्या वेगवान प्रवाहामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीही वाहून गेल्या. तसेच संस्थानची शेती पूर्णपणे खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. संस्थानच्या गोरक्षण विभागालाही या पुराचा मोठा फटका बसला. गुरांसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थानचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान, आज (१ ऑगस्ट) तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी महापुराच्या खुणा आणि नुकसानीचे चित्र अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदत प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1