logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.

5 hrs ago
user_Shoukat  Shaikh
Shoukat Shaikh
बारामती, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    1
    भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले 
विक्रम शिंदे /भोर दि. 31
भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. उघडकीस आलेले ६ गुन्हे शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६ धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६ मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६ सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६ सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
    1
    शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
उघडकीस आलेले ६ गुन्हे
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६
धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६
मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६
सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली.
शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    10 hrs ago
  • नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत
    1
    नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन

पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    1
    “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    1
    खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार
पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज
: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नदीपात्रात जाऊ नये.
पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये.
अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    user_Tejas Walunj
    Tejas Walunj
    Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. राजरोस वृक्ष तोंड, उत्खनन करून माती,मूर्माचे विक्री, किती रोप आणली किती लागवड व वृक्ष जतन झाले का? कोट्यवधी पैसा व निधी हडप. माती ,मुरुमाची रॉयल्टी भरले का? सिन्नर फॉरेस्ट कार्यालयात भयंकर भ्रष्टाचार? अवैध वृक्ष तोड -- ------------------ सिन्नर तालुक्यातील वनक्षेत्रात दररोज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहेत. अधिकारी दुर्लक्ष करतात याआडून भ्रष्टाचार चालू आहेत. माती व मुरुमाची बेकायदेशीर उत्खनन व विक्री --- ---------------------------------++ वनजमिनींतून अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले आहेत. रॉयल्टी चुकवून यात अधिकारी कर्मचारी यांनी टेबलाखालून वरून पैसा कमावत भ्रष्टाचार केला आहेत. आज पर्यंत वनक्षेत्र जमिनीत उत्खनन किती झाले? किती रॉयल्टी भरली? किती पैसा कुणीकुणी हडपला याची चौकशी व्हावी. मलिदा चाखायचाय मिळतोय यामुळे वारेमाप उत्खनन होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत. वृक्ष रोप व वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार - --------------------------------- आजपर्यंत रोप खरेदी किती खर्च प्रत्यक्षात किती रोप खरेदी? लागवड किती केली? वृक्ष जतन खर्च किती? वृक्ष जगली किती? जंगल कुठे वाढवली? यासाठी निधी किती आला? हा कोट्यवधी निधी कुठे खर्च केला! याचा रिझल्ट म्हणजे जंगल, झाडे कुठे? हिशोब द्यावा. म्हणून काही रानात वणवा पेटला की झाकण्यासाठी पेटविला? रान पेटवत कोण? हेतू काय? अनेक जंगल राखण करण्यासाठी त्या भागातील साधाभोळा शेतकरी कर्मचारी नेमायाचा. त्याचा पगार न देता हडप करायचा. पैसे झिरवण्यासाठी त्याला वर्ष दोन वापरून कामावरून कमी करायचे.याची चौकशी करून कारवाई करावी. वृक्ष लागवड व जतन योजनेत कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार झाला आहेत. कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी. वरील मागण्यासाठी व या भ्रष्टाचार विरोधात शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर वतीने आमरण उपोषण करण्यात येणार. - शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर मो.९६८९३५०६२२.
    1
    सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा.

सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा.
राजरोस वृक्ष तोंड, उत्खनन करून माती,मूर्माचे विक्री, किती रोप आणली किती लागवड व वृक्ष जतन झाले का? कोट्यवधी पैसा व निधी हडप. माती ,मुरुमाची रॉयल्टी भरले का?
सिन्नर फॉरेस्ट कार्यालयात भयंकर भ्रष्टाचार?
अवैध वृक्ष तोड --
------------------
सिन्नर तालुक्यातील वनक्षेत्रात दररोज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहेत. अधिकारी दुर्लक्ष करतात याआडून भ्रष्टाचार चालू आहेत.
माती व मुरुमाची बेकायदेशीर उत्खनन व विक्री ---
---------------------------------++
वनजमिनींतून अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले आहेत. रॉयल्टी चुकवून यात अधिकारी कर्मचारी यांनी टेबलाखालून वरून पैसा कमावत भ्रष्टाचार केला आहेत. आज पर्यंत वनक्षेत्र जमिनीत उत्खनन किती झाले? किती रॉयल्टी भरली? किती पैसा कुणीकुणी हडपला याची चौकशी व्हावी. मलिदा चाखायचाय मिळतोय यामुळे वारेमाप उत्खनन होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत.
वृक्ष रोप व वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार -
---------------------------------
आजपर्यंत रोप खरेदी किती खर्च प्रत्यक्षात किती रोप खरेदी? लागवड किती केली? वृक्ष जतन खर्च किती? वृक्ष जगली किती? जंगल कुठे वाढवली? यासाठी निधी किती आला? हा कोट्यवधी निधी कुठे खर्च केला! याचा रिझल्ट म्हणजे जंगल, झाडे कुठे? हिशोब द्यावा. म्हणून काही रानात वणवा पेटला की झाकण्यासाठी पेटविला? रान पेटवत कोण? हेतू काय?
अनेक जंगल राखण करण्यासाठी त्या भागातील साधाभोळा शेतकरी कर्मचारी नेमायाचा. त्याचा पगार न देता हडप करायचा. पैसे झिरवण्यासाठी त्याला वर्ष दोन वापरून कामावरून कमी करायचे.याची चौकशी करून कारवाई करावी.
वृक्ष लागवड व जतन योजनेत कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार झाला आहेत. कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी.
वरील मागण्यासाठी व या भ्रष्टाचार विरोधात शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर वतीने आमरण उपोषण करण्यात येणार.
- शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर 
मो.९६८९३५०६२२.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    13 hrs ago
  • *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश* दिनांक 31/07/2026 वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे. मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    4
    *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे  गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार,  राज्यमंत्री दर्जा  प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश*
दिनांक 31/07/2026 
वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला  आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची  उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे.
मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा  प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.