मूलभूत प्रश्नांवर राशीनची ग्रामसभा गाजली . विविध ठराव मांडले . राशीन प्रतिनिधी : राशीन शहरातील तुंबलेल्या गटारी, मोकाट जनावरांनी त्रस्त झालेले ग्रामस्थ , सार्वजनिक स्मशानभूमीची दुरवस्था , महावितरण चा स्मार्ट मीटर , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण, रस्त्यावरील बंद पथदिवे, धोकादायक जीर्ण झालेली गाववेस, भाड्याच्या खोलीतील पोलिस दूरक्षेत्र, यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक , अण्णाभाऊ साठे चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक या सर्व चौकांचे सुशोभीकरण करणे , यासह ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या मुलभूत प्रश्नांवर राशीनची ग्रामसभा तीन तास गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक दिलीप कराळे होते. यावेळी कामगार तलाठी अतुल सुपेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब चव्हाण, कृषी सहायक सतीश सरोदे, मुख्याध्यापक बापूराव वावगे, अशोक नेवसे यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होते. मंजूर घरकुलांच्या बाबतीतील नियम व अटी शिथिल कराव्यात, गट क्रमांक १४७६ व १४७७ वरील अतिक्रमण कायम न करता, अतिक्रमण धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, प्रभाग दोनला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा द्यावा. अंत्यविधीसाठी विसावा कट्टा उभारावा. १३ कोटींच्या पाणी योजनेचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, जनावरांचा कत्तलखाना (गोवंश वगळून) सुरू करावा, असे ठराव सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास राऊत, रवींद्र दामोदरे, मालोजीराजे भिताडे, विजय साळवे, तात्या माने, अतुल साळवे, कमलेश साळवे, मयूर धनवडे , श्रीकांत सायकर, सचिन साळवे आदींनी मांडले.ग्रामसभेस सोयब काझी, तात्या माने , प्रा.विजयकुमार साळवे , नितीन साळवे , पवन जांभळकर, संतोष ढावरे, गणेश कदम, जितेंद्र शेटे, औदुंबर देवगावकर, कुंडलिक सायकर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तीन तास चाललेल्या ग्रामसभेत शेवटच्या मिनिटांपर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

- खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.1
- बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा1
- डॉक्टरने मेडिकल मधील औषध गोळ्या घेण्यासाठी कॅपिटल अक्षर आवश्यक.1
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.1
- धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा. 📢 धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा. जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानिक बातम्या, नागरिकांच्या समस्या, प्रशासनाशी संबंधित घडामोडी, सामाजिक विषय आणि परिसरातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. 🔴 झुंजार SC 37 NEWS OSMANABAD स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 बातमी, मुलाखत व जाहिरातीसाठी संपर्क: 08805974164 🔑 Keywords / कीबोर्ड धाराशिव बातम्या, उस्मानाबाद बातम्या, धाराशिव न्यूज, उस्मानाबाद न्यूज, धाराशिव आजच्या बातम्या, धाराशिव ताज्या बातम्या, उस्मानाबाद ताज्या बातम्या, धाराशिव दहा ठळक घडामोडी, 28 ऑगस्ट 2026 बातम्या, धाराशिव परिसरातील बातम्या, उस्मानाबाद परिसरातील बातम्या, महाराष्ट्र न्यूज, मराठी न्यूज, आजच्या दहा ठळक बातम्या, झुंजार SC 37 NEWS, Osmanabad News, Dharashiv News #️⃣ Hashtags #धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #आजच्याबातम्या #ताज्याबातम्या #दहा_ठळक_घडामोडी #महाराष्ट्रन्यूज #मराठीन्यूज #DharashivNews #OsmanabadNews #BreakingNews #MarathiNews #ZunjharSC37News1
- सातारा तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न1