राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*1
- ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1