logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक;‘राजा शिवाजी’ चित्रपटाने जागवला स्वराज्याचा अभिमान मालेगाव : अभिनेते रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा भव्य ऐतिहासिक चित्रपट शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव येथील संदेश सिनेमॅक्समध्ये कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि जनतेप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे चित्रपटातून साकारण्यात आले आहे. दमदार अभिनय, भव्य सादरीकरण आणि वास्तवदर्शी ऐतिहासिक चित्रणामुळे प्रेक्षक पुन्हा शिवकालीन इतिहासाशी जोडले जात आहेत. स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने, विशेषतः तरुण पिढीने आवर्जून पाहावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
7b3d67cc-031e-4064-8977-ee451556a30f

नाशिक;‘राजा शिवाजी’ चित्रपटाने जागवला स्वराज्याचा अभिमान मालेगाव : अभिनेते रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा भव्य ऐतिहासिक चित्रपट शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव येथील संदेश सिनेमॅक्समध्ये कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि जनतेप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे चित्रपटातून साकारण्यात आले आहे. दमदार अभिनय, भव्य सादरीकरण आणि वास्तवदर्शी ऐतिहासिक चित्रणामुळे प्रेक्षक पुन्हा शिवकालीन इतिहासाशी जोडले जात आहेत. स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने, विशेषतः तरुण पिढीने आवर्जून पाहावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    1
    नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी
आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    49 min ago
  • नाशिक महापालिका प्रशासनाने दिव्यागांच्या समस्या प्रश्नी बोलवलेली बैठक रद्द केल्याने प्रहार संघटना पदाधिकारी संतप्त नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत्र न वळवता तो दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात याव्या आदी मागण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांगांकडे महानगरपालिकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली. दिव्यांगांच्या मागण्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,हाॅकर्स झोन चे अध्यक्ष वसंत ठाकुर, मुकबधिर जिल्हाध्यक्ष शोहेब सिद्दीकी,उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी,शहराध्यक्ष सुभाष निकाळजे, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कांगणे,उपशहरप्रमुख दिपक भोई आदी सह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    नाशिक महापालिका प्रशासनाने दिव्यागांच्या समस्या प्रश्नी बोलवलेली बैठक रद्द केल्याने प्रहार संघटना पदाधिकारी संतप्त 
नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला  मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत्र न वळवता तो दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात याव्या आदी मागण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांगांकडे महानगरपालिकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली. दिव्यांगांच्या मागण्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले
या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,हाॅकर्स झोन चे अध्यक्ष वसंत ठाकुर, मुकबधिर जिल्हाध्यक्ष शोहेब सिद्दीकी,उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी,शहराध्यक्ष सुभाष निकाळजे, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कांगणे,उपशहरप्रमुख दिपक भोई आदी सह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिकमध्ये एका प्रेमी युगुलाला एकत्र फिरताना लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
    1
    नाशिकमध्ये एका प्रेमी युगुलाला एकत्र फिरताना लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    1
    नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    user_My Lovely School
    My Lovely School
    Teacher सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील जंगलात वणवा लागतो कि लावला जातो. हे अद्यापही स्पष्ट नाही.
    1
    सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील जंगलात वणवा लागतो कि लावला जातो. हे अद्यापही स्पष्ट नाही.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • येवला तालुक्यातील देवळाणे येथील शेतकऱ्यावरील ॲसिड हल्ल्या प्रकरणी दोन आरोपी गजाआड येवल्यात शेतकऱ्यावरील ॲसिड तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकऱ्यासह त्यांच्या पत्नीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ला प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली असून, जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे. दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी घराच्या गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर ॲसिडसदृश घातक पदार्थ टाकला होता. या हल्ल्यात बोर्डे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ​तपासाचे चक्र आणि अटक: घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने पथके रवाना केली होती. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे: १) चांगदेव देवराम मोरे (वय ४० वर्ष) २) सचिन जालिंदर कोटमे (वय २० वर्ष) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाऊसाहेब बोर्डे आणि आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच, बोर्डे यांचे यंदा कांद्याचे पीक चांगले आल्याने आणि ते आरोपीबद्दल लोकांशी वाईट बोलत असल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचला. शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड बाटलीत भरून त्यांनी हा हल्ला केला. ​सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. संदीप मंडलीक आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला तालुक्यातील देवळाणे येथील शेतकऱ्यावरील ॲसिड हल्ल्या प्रकरणी दोन आरोपी गजाआड

येवल्यात शेतकऱ्यावरील ॲसिड  तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकऱ्यासह त्यांच्या पत्नीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ला प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली असून, जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी घराच्या गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर ॲसिडसदृश घातक पदार्थ टाकला होता. या हल्ल्यात बोर्डे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​तपासाचे चक्र आणि अटक:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने पथके रवाना केली होती. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१) चांगदेव देवराम मोरे (वय ४० वर्ष)
२) सचिन जालिंदर कोटमे (वय २० वर्ष)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाऊसाहेब बोर्डे आणि आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच, बोर्डे यांचे यंदा कांद्याचे पीक चांगले आल्याने आणि ते आरोपीबद्दल लोकांशी वाईट बोलत असल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचला. शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड बाटलीत भरून त्यांनी हा हल्ला केला.
​सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. संदीप मंडलीक आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    1
    नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक
येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.