Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
Kapil Katyare
नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महाराष्ट्राच्या माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 'भोंदू खरात' प्रकरणामुळे अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली. त्यांच्या या संवादातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.1
- हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगाव-खरुडे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.1
- १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेने ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक व नोकरभरतीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून, तातडीने निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.1
- देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि. ०८/०५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी असे शेतवस्तीवरील राहते घराचे गच्चीवर झोपलेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्यांचे डोळयावर, चेह-यावर, शरिरावर अॅसिड सदृष्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले म्हणून येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २३१/२०२६ भा.न्या.सं. कलम १२४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळ व आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर घटनेतील जखमी यांचेकडे सदर घटनेबाबत माहिती घेवून, तपास सुरू केला. सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खालील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी १) चांगदेव देवराम मोरे, वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक २) सचिन जालिंदर कोटमे, वय २०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक सदर घटनेतील जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व यातील आरोपी क. १ चांगदेव मोरे यांचेत शेतीचे बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनाज धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड सदृष्य पदार्थ बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री यातील जखमींवर सदरचा अॅसिड हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांचे पथक करीत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार, येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.1
- ग्वालियर लॉ छात्रा अपहरण केस में बड़ा खुलासा, युवती बोली- पिस्टल की नोक पर बनवाया गया वीडियो प्रदेशभर में चर्चा का विषय बने ग्वालियर लॉ छात्रा अपहरण मामले में अब नया खुलासा हुआ है। पहले आरोपी का वीडियो सामने आया था, वहीं अब पीड़ित छात्रा का वीडियो वायरल हुआ है। वीडियो में छात्रा दावा कर रही है कि पिस्टल दिखाकर उसे धमकाया गया और जबरन वीडियो बनवाया गया। साथ ही उसने कहा कि उसका जीतू तोमर से किसी भी तरह का कोई संबंध नहीं है।1
- नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.1
- जागतिक पातळीवर युद्धसदृश परिस्थिती आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केले आहे. त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या खरेदीबाबत जनतेला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.1
- इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.1