Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.
Kapil Katyare
नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.1
- नाशिक महापालिका प्रशासनाने दिव्यागांच्या समस्या प्रश्नी बोलवलेली बैठक रद्द केल्याने प्रहार संघटना पदाधिकारी संतप्त नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत्र न वळवता तो दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात याव्या आदी मागण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांगांकडे महानगरपालिकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली. दिव्यांगांच्या मागण्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,हाॅकर्स झोन चे अध्यक्ष वसंत ठाकुर, मुकबधिर जिल्हाध्यक्ष शोहेब सिद्दीकी,उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी,शहराध्यक्ष सुभाष निकाळजे, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कांगणे,उपशहरप्रमुख दिपक भोई आदी सह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.1
- नाशिकमध्ये एका प्रेमी युगुलाला एकत्र फिरताना लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.1
- नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.1
- सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील जंगलात वणवा लागतो कि लावला जातो. हे अद्यापही स्पष्ट नाही.1
- येवला तालुक्यातील देवळाणे येथील शेतकऱ्यावरील ॲसिड हल्ल्या प्रकरणी दोन आरोपी गजाआड येवल्यात शेतकऱ्यावरील ॲसिड तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकऱ्यासह त्यांच्या पत्नीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ला प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली असून, जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे. दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी घराच्या गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर ॲसिडसदृश घातक पदार्थ टाकला होता. या हल्ल्यात बोर्डे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाचे चक्र आणि अटक: घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने पथके रवाना केली होती. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे: १) चांगदेव देवराम मोरे (वय ४० वर्ष) २) सचिन जालिंदर कोटमे (वय २० वर्ष) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाऊसाहेब बोर्डे आणि आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच, बोर्डे यांचे यंदा कांद्याचे पीक चांगले आल्याने आणि ते आरोपीबद्दल लोकांशी वाईट बोलत असल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचला. शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड बाटलीत भरून त्यांनी हा हल्ला केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. संदीप मंडलीक आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.1