पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता...! पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात आरोग्य शिबिर, भूमिपूजन, उद्घाटन, जयंती इत्यादींसाठी मंडप स्टेज व्यवस्था करणे, आकुर्डी हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, मनपा कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांनी कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे व शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती संस्थांची नेमणूक करणे, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, मनपाच्या विविध विभागांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार ६५ इंची एलईडी टीव्ही (२० नग) एक वर्ष कालावधीकरिता खरेदी करणे, प्रभाग क्रमांक ३१, ३२ नवी सांगवी, जुनी सांगवी येथे आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घेणे व जुन्या बोअरवेलची देखभाल दुरुस्ती करणे, मनपाच्या चार शाळांसाठी स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट साहित्य चार किट खरेदी करणे, ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध प्रशासकीय इमारती, शाळा व कार्यालयांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती करणे, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व मैला शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये फलक लावणे व अनुषंगिक कामे करणे, नवीन तालेरा येथे विविध विद्युत विषयक कामांसाठी कुशल कर्मचारी पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करणे, रावेत येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुलावरून सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह फिटिंग पोल बसविणे व अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणे, मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व मनपा उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता रेडिओ स्टेशनवरून जाहिराती प्रसिद्ध करणे, उद्यान वृक्ष संवर्धन विभागासाठी संगणक प्रणालीद्वारे कामांचे सहनियंत्रण करण्यासाठी वेब व मोबाईल आधारित संगणक प्रणाली विकसित करणे, जिजामाता पिंपरी आकुर्डी मासुळकर हॉस्पिटल येथील ईटीपी विषयक चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधील परिसरातील किरकोळ देखभाल-दुरुस्ती व अनुषंगिक इतर स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये डीपी रस्त्यालगत फुटपाथ विकसित करणे व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २४ थेरगाव येथे आवश्यकतेनुसार ब्लॉक फुटपाथ, डिव्हायडर व नाला-दुरुस्तीची कामे तसेच इतर स्थापत्य विषयक कामे करणे, केंद्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रकल्पाचे कामकाज चालवण्यासाठी एजन्सीची निवड करणे, आकुर्डी येथील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयातील क्ष-किरण विभागाकरिता आवश्यक असलेली डिस्कॉम संगणक प्रणाली कार्यान्वित करणे, महानगरपालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण विभागांच्या नियंत्रणाखाली असणारे आकुर्डी माध्यमिक विद्यालय येथील एमएससीआयटी केंद्राचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करणे, मनपाचे नेत्र रुग्णालय व भोसरी रुग्णालय येथे फायर ऑडिट करणे, अहवालाप्रमाणे कामे करणे व अनुषंगिक कामे करणे, क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड येथील संग्रहालयाच्या स्वच्छतेविषयी कामाकरिता दोन कर्तव्यतत्पर आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करणे, प्रभाग क्रमांक २५ येथील पुणे-बेंगलोर हायवेच्या पूर्वेकडील वाकड-पुनावळे-ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करणे, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, खुशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्तीची कामे करणे, आवश्यकतेनुसार पाइपलाइन टाकणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करणे, प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणे, नेहरूनगर श्वान नियमन शस्त्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे, प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत, किवळे व वाल्हेकरवाडी भागातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे व नाले साफसफाईसाठी व इतर आवश्यक कामांसाठी मशिनरी पुरविणे, प्रभाग क्र. २ चिखलीमधील नाल्यांची साफसफाई करणे, पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील मनपाच्या मैला शुद्धीकरण केंद्र तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यासाठी संस्थेची नेमणूक करणे, सांगवी मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे चालन व देखभाल-दुरुस्ती करणे, थेरगाव उपविभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ मध्ये विद्युत विषयक बाबींचे नूतनीकरण करणे, प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णा नगर, पूर्णा नगर, शरद नगर, शिवतेज नगर, कोयना नगर घरकुल प्रकल्प, हरगुडे वस्ती, नेवाळे वस्ती व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलनिस्सारण नलिका टाकणे आदी कामांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रतिक्रिया.... "शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजच्या सभेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. विशेषतः शाळांचे सक्षमीकरण, रुग्णालयांची सुरक्षा आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई या विषयांना आम्ही प्राधान्य दिले आहे. पारदर्शक कारभार आणि वेळेत काम पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे." - अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता...! पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात आरोग्य शिबिर, भूमिपूजन, उद्घाटन, जयंती इत्यादींसाठी मंडप स्टेज व्यवस्था करणे, आकुर्डी हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, मनपा कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांनी कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे व शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती संस्थांची नेमणूक करणे, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, मनपाच्या विविध विभागांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार ६५ इंची एलईडी टीव्ही (२० नग) एक वर्ष कालावधीकरिता खरेदी करणे, प्रभाग क्रमांक ३१, ३२ नवी सांगवी, जुनी सांगवी येथे आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घेणे व जुन्या बोअरवेलची देखभाल दुरुस्ती करणे, मनपाच्या चार शाळांसाठी स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट साहित्य चार किट खरेदी करणे, ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध प्रशासकीय इमारती, शाळा व कार्यालयांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती करणे, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व मैला शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये फलक लावणे व अनुषंगिक कामे करणे, नवीन तालेरा येथे विविध विद्युत विषयक कामांसाठी कुशल कर्मचारी पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करणे, रावेत येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुलावरून सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह फिटिंग पोल बसविणे व अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणे, मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व मनपा उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता रेडिओ स्टेशनवरून जाहिराती प्रसिद्ध करणे, उद्यान वृक्ष संवर्धन विभागासाठी संगणक प्रणालीद्वारे कामांचे सहनियंत्रण करण्यासाठी वेब व मोबाईल आधारित संगणक प्रणाली विकसित करणे, जिजामाता पिंपरी आकुर्डी मासुळकर हॉस्पिटल येथील ईटीपी विषयक चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधील परिसरातील किरकोळ देखभाल-दुरुस्ती व अनुषंगिक इतर स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये डीपी रस्त्यालगत फुटपाथ विकसित करणे व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य
विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २४ थेरगाव येथे आवश्यकतेनुसार ब्लॉक फुटपाथ, डिव्हायडर व नाला-दुरुस्तीची कामे तसेच इतर स्थापत्य विषयक कामे करणे, केंद्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रकल्पाचे कामकाज चालवण्यासाठी एजन्सीची निवड करणे, आकुर्डी येथील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयातील क्ष-किरण विभागाकरिता आवश्यक असलेली डिस्कॉम संगणक प्रणाली कार्यान्वित करणे, महानगरपालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण विभागांच्या नियंत्रणाखाली असणारे आकुर्डी माध्यमिक विद्यालय येथील एमएससीआयटी केंद्राचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करणे, मनपाचे नेत्र रुग्णालय व भोसरी रुग्णालय येथे फायर ऑडिट करणे, अहवालाप्रमाणे कामे करणे व अनुषंगिक कामे करणे, क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड येथील संग्रहालयाच्या स्वच्छतेविषयी कामाकरिता दोन कर्तव्यतत्पर आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करणे, प्रभाग क्रमांक २५ येथील पुणे-बेंगलोर हायवेच्या पूर्वेकडील वाकड-पुनावळे-ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करणे, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, खुशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्तीची कामे करणे, आवश्यकतेनुसार पाइपलाइन टाकणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करणे, प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणे, नेहरूनगर श्वान नियमन शस्त्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे, प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत, किवळे व वाल्हेकरवाडी भागातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे व नाले साफसफाईसाठी व इतर आवश्यक कामांसाठी मशिनरी पुरविणे, प्रभाग क्र. २ चिखलीमधील नाल्यांची साफसफाई करणे, पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील मनपाच्या मैला शुद्धीकरण केंद्र तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यासाठी संस्थेची नेमणूक करणे, सांगवी मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे चालन व देखभाल-दुरुस्ती करणे, थेरगाव उपविभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ मध्ये विद्युत विषयक बाबींचे नूतनीकरण करणे, प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णा नगर, पूर्णा नगर, शरद नगर, शिवतेज नगर, कोयना नगर घरकुल प्रकल्प, हरगुडे वस्ती, नेवाळे वस्ती व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलनिस्सारण नलिका टाकणे आदी कामांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रतिक्रिया.... "शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजच्या सभेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. विशेषतः शाळांचे सक्षमीकरण, रुग्णालयांची सुरक्षा आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई या विषयांना आम्ही प्राधान्य दिले आहे. पारदर्शक कारभार आणि वेळेत काम पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे." - अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!1
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- शासनाचे टँकर जनतेसाठी नहीं तर पत्रकारांच्या घरात झोपडीत आलेले टँकर प्रायव्हेट सोसायटी मधे विकले जातात विकले जातात भर उन्हाळा मधे जनतेला पाणी नहीं गरिबांच्या हक्काचे टँकर विकले जातात1
- Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1