लातूरच्या उदगीर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी शासनाने राखीव ठेवलेला ५ टक्के निधी अनेक वर्षांपासून वितरित करण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप प्रहार संघटना महाराष्ट्र राज्याने केला आहे. या संदर्भात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे आणि तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे यांच्या वतीने उदगीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात उदगीर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आजपर्यंतच्या दिव्यांग ५% निधीचा संपूर्ण लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी निधीचे वितरण केले नाही त्यांनी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरित करावा, तसेच निधी वितरणात जाणीवपूर्वक टाळाटाळ, हलगर्जीपणा किंवा कामात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) व इतर लागू असलेल्या प्रशासकीय नियमांनुसार दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काच्या निधीपासून वंचित ठेवणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये, अशी भूमिका प्रहार संघटनेने मांडली आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, धरणे, उपोषण, मोर्चा तसेच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.2
- दुबई येथे आयोजित एका जागतिक व्यासपीठावर भारतीय शिक्षिका रुबल नेगी यांना प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल १३९ देशांतील स्पर्धकांमधून रुबल नेगी यांची या जागतिक पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांना एक मिलियन डॉलरची पुरस्कार राशी देऊन गौरवण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे कुंडलवाडी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५७ हजार ८४० रुपये रोख रक्कम आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या एकूण १२ जणांविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- ५९ जातींच्या आरक्षण वर्गीकरण करण्याच्या विरोधात ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे आढावा बैठक संपन्न झाली आहे.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.1
- लातूरच्या प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक बोर गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे बंद पडलेल्या बोरची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्यात आली आणि नवीन पाईप लाईनचे कामही पूर्ण करण्यात आले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बोर पुन्हा सुरू झाला आहे. यावेळी प्रभागातील आजी आणि माजी नगरसेविकांसह माधव जाधव, रंजना शिंदे, रेखा बिराजदार, शहाजी सुर्यवंशी, सोनाली सुर्यवंशी, बाळु शिंदे, तानाजी शिंदे, गुरूराज पाटील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे पार पडलेल्या पादुका सोहळा आणि संतांच्या कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारकरी संमेलनादरम्यान पैशाचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 'पिस्तुल्या' म्हणून ओळखला जाणारा किशोर महाराज शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.1