Shuru
Apke Nagar Ki App…
निर्भीड निष्पक्ष सत्यता मांडणारा सर्वसामान्यांचा आवाज बनून अन्यायाविरुद्ध लढत न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणारा मराठी वृत्तपत्र अन्यायाविरुद्ध विरुद्ध वाचा फोडणारा गोरगरीब सर्वसामान्यांचा आवाज निष्पक्ष निर्भीड आपले मत मांडणारा आपल्या लेखणीने राज्यातील तथा जिल्ह्यातील रोजच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारा मराठी वृत्तपत्र दैनिक लढणारा कलमवीर वाचत रहा रोजच्या घडामोडी साठी
Shivkumar kale Press reporter
निर्भीड निष्पक्ष सत्यता मांडणारा सर्वसामान्यांचा आवाज बनून अन्यायाविरुद्ध लढत न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणारा मराठी वृत्तपत्र अन्यायाविरुद्ध विरुद्ध वाचा फोडणारा गोरगरीब सर्वसामान्यांचा आवाज निष्पक्ष निर्भीड आपले मत मांडणारा आपल्या लेखणीने राज्यातील तथा जिल्ह्यातील रोजच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारा मराठी वृत्तपत्र दैनिक लढणारा कलमवीर वाचत रहा रोजच्या घडामोडी साठी
More news from Maharashtra and nearby areas
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.1
- Post by Today One Live1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप5
- मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1