चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीची तिचे वडील आणि भावानेच हत्या केली. चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. जळगाव जामोद पोलिस ठाण्यात २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात एका महिलेचे धड अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी १२ दिवस तपास करून खकनार येथील कलमेकर बापलेकाला ताब्यात घेतले. लग्नाच्या पाचव्या दिवशी खून मृत युवतीचा विवाह १५ एप्रिल रोजी खाऱ्या टेंभूर (धारणी, जि. अमरावती) येथील युवकासोबत झाला होता. पाच दिवसांनी, २० एप्रिल रोजी ती माहेरी खडकी येथे आली होती. तिचे चुलत भावासोबतच प्रेम होते. लग्नानंतरही ती ऐकत नसल्याने २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास शिवानीची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली.

- बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- चिखली केमिस्ट संघटनेने अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमास एक महिन्याचे धान्य व किराणा साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. संघटनेने समाजातील दात्यांना या वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.2
- सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील मराठी भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठीत शपथ घेतल्याने त्यांच्या भाषणाची आणि व्हिडीयची सर्वत्र चर्चा होत असून, तो प्रचंड व्हायरल झाला आहे.1
- जळगाव जामोद जवळ मिनी बसचा भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी, चालक फरार... जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव जवळ मिनी बसचा भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी, चालक फरार...1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.1
- येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.1